Vidhansabha Election Pune | पुण्यात काँग्रेस कडून रविंद्र धंगेकर, तर शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रशांत जगताप, बापूसाहेब पठारे यांना संधी

HomeBreaking News

Vidhansabha Election Pune | पुण्यात काँग्रेस कडून रविंद्र धंगेकर, तर शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रशांत जगताप, बापूसाहेब पठारे यांना संधी

Ganesh Kumar Mule Oct 24, 2024 9:58 PM

Bapusaheb Pathare | भाजप मध्ये कार्यरत असलेले बापूसाहेब पठारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश! 
Ajit Pawar on Bapu Pathare | आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत ; अजित पवारांचा माजी आमदार बापू पठारे यांना इशारा
MLA Sunil Tingre | वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुनिल टिंगरे यांना संधी 

Vidhansabha Election Pune | पुण्यात काँग्रेस कडून रविंद्र धंगेकर, तर शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रशांत जगताप, बापूसाहेब पठारे यांना संधी

Pune News – (The Karbhari News Service) – महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी सायंकाळी आपल्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसने देखील ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

काँग्रेस कडून कसबा पेठ मधून पुन्हा एकदा आमदार रविंद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाकडून हडपसर साठी प्रशांत जगताप यांना तर वडगावशेरी साठी बापूसाहेब पठारे यांना संधी देण्यात आली आहे.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवार गटाच्या यादीनुसार स्वतः जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे चुलते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होईल. काँग्रेसने देखील आपली यादी जाहीर करत पहिल्या फळीतील नेत्यांना संधी दिली आहे.

—-

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष महासंसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटीलसाहेब, लोकप्रिय खासदार डॉ. अमोलजी कोल्हे यांचे आभार मानतो. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जूनजी खर्गे साहेब, ज्येष्ठ नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी, तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय प्रियांकाजी गांधी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नाना पटोलेसाहेब यांचेही आभार मानतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय उद्धवजी ठाकरेसाहेब, मा. आदित्यजी ठाकरे यांचे मन:पूर्वक आभार मानतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष या मित्रपक्षांच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे आभार मानतो.ज्यांचे माझ्यावर असंख्य ऋण आहेत, राहणार आहेत, असे माझे कुटुंब म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघातील माझ्या बंधू – भगिनी, माता – पित्यांच्या आयुष्यभर ऋणात राहतो. तुम्ही सर्वांनी मला जे प्रेम दिलं आहे, ही निवडणूक जिंकण्याचा मला जो विश्वास दिला आहे, या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. ही जाणीव ठेवूनच मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्या सेवेसाठी अर्पण करण्याचा शब्द आपणांस देत आहे.पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून आज उमेदवारी दिल्याने खरे तर आता माझी जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी नक्कीच यशस्वीपणे पेलेन हा  विश्वास आहे.

  • प्रशांत जगताप
  • ———

ही उमेदवारी केवळ माझी नाही. कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा हा सन्मान आहे. जिवाभावाच्या माणसांच्या सेवेसाठी घेतलेले व्रत यापुढेही अखंडपणे सुरूच असेल हे मी सर्वांना वचन देतो !
कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारीचे संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार !

  • आमदार रविंद्र धंगेकर