Vidhansabha Election 2024 | शरद पवारांची विधानसभा निवडणुकीत आघाडी | पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवले

NCP - SCP

HomeBreaking News

Vidhansabha Election 2024 | शरद पवारांची विधानसभा निवडणुकीत आघाडी | पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवले

Ganesh Kumar Mule Aug 28, 2024 8:59 PM

Time Bounde Promotion | कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांकडून मागवली माहिती  | शिफारस फॉर्म भरून द्यावा लागणार 
Pune moves from 20th to 10th position in Swachh Survekshan’s All India Ranking  |  2nd rank in Maharashtra
Chandrakant Patil | ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्र उभारणीत सर्वतोपरी सहकार्य करु | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Vidhansabha Election 2024 | शरद पवारांची विधानसभा निवडणुकीत आघाडी | पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवले

 

NCP -SCP – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी येणाऱ्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे.

पक्षाचे मजबूत संघटन व प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेली इच्छुकांची संख्या पाहता राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे अर्ज उपलब्ध आहेत.
दिनांक २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत अर्ज स्विकारण्याची मुदत असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या वेळेत जमा करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग : १० हजार रुपये
इतर प्रवर्ग : ५ हजार रुपये

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0