Valmik Karad | वाल्मिक कराड याला पुण्यात राहण्यास कोणी कोणी साथ दिली ह्याची चौकशी करा | पुणे पोलिसांना शिवसेनेचे निवेदन

HomeBreaking News

Valmik Karad | वाल्मिक कराड याला पुण्यात राहण्यास कोणी कोणी साथ दिली ह्याची चौकशी करा | पुणे पोलिसांना शिवसेनेचे निवेदन

Ganesh Kumar Mule Dec 31, 2024 10:01 PM

MLA Fund | Sunil Tingre | सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे
Water Distribution planning | उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी महापालिका आणि जलसंपदा खात्याची उद्या बैठक
Chandrakant Patil | वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा ट्रॅफिक पोलिसांच्या बाईकवरुन प्रवास

Valmik Karad | वाल्मिक कराड याला पुण्यात राहण्यास कोणी कोणी साथ दिली ह्याची चौकशी करा | पुणे पोलिसांना शिवसेनेचे निवेदन

 

Santosh Deshmukh Case – (The Karbhari News Service) – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला पुण्यात राहण्यास कोणी कोणी साथ दिली ह्याची चौकशी करावी, यासाठी पुणे पोलिसांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. (Shivsena Pune – UBT)

बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेमधे मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा मागील २२ दिवस महाराष्ट्र सरकारला , मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस प्रशासनाला गुंगारा देत फिरत होता, त्यावेळी तो मागील बरेच दिवस पुण्यात असल्याचे त्याच्या सोबत असलेल्या बिडच्या नगरसेवकाच्या मीडियासोबत बोलतानाच्या स्टेटमेंट वरून सिद्ध झाले आहे, ह्याचा अर्थ आरोपी वाल्मिक कराड हा पुण्यात वास्तव्यास होता. त्यामुळे पुण्यात त्याला कोणी मदत केली ह्याची पण सखोल चौकशी व्हावी आणि त्यांनाही सदर विषयात सहआरोपी करन्यात यावे. पुणे शहरातील व इतर भागातील किती समर्थक त्याच्या संपर्कात होते व त्याला साथ देत होते याची चौकशी करण्यात यावी. तसेच पुणे शहर हे गुन्हेगारांना वास्तव्यासाठी सुरक्षित का वाटत आहे ? पुणे शहरातील गुन्हेगार इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांना सहकार्य करतात असा संशय येतो म्हणून या विषयाचा तपास होणे आवश्यक वाटते. महाराष्ट्रातील गुन्हेगारी समूळ नष्ट व्हावी यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहील असे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले .

वाल्मिक कराड आज पोलिसासमोर हजर होणार हे पोलिसां व्यतिरिक्त इतर लोकांना अगोदर माहिती असते, सरकारवर उपकार केल्यासारखा आरोपी सीआयडी समोर हजर होतो मग आरोपी अनेक दिवस बीडच्या गाड्या घेऊन समर्थकांसह पुण्यात असून सापडत नाही हे पुणेकर नागरिकांना पटण्याजोगे नाही.
या विषयाची सखोल चौकशी व्हावी यासाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीने पुणे पोलिस विशेष शाखेचे उपायुक्त मिलिंद मोहिते  यांस पत्र देण्यात आले .

यावेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख आबा निकम, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवा सेना समन्वयक युवराज पारिख, संघटक अजय परदेशी, उपविभाग प्रमुख अनिल परदेशी, सुरेश घाडगे, संजय साळवी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0