V Radha IAS  | पुणे महापालिकेच्या “या” कामाबाबत राज्याच्या अतिरिक्त सचिवानी केले कौतुक!

Homeadministrative

V Radha IAS  | पुणे महापालिकेच्या “या” कामाबाबत राज्याच्या अतिरिक्त सचिवानी केले कौतुक!

Ganesh Kumar Mule Sep 16, 2025 9:24 AM

Fursungi Garbage Depot | फुरसुंगी कचरा डेपो समस्या पुन्हा डोके वर काढतेय; तातडीने उपाययोजनांची गरज
Single Use Plastic | प्लास्टिक बाबत कठोर कारवाई न करता आधी जनजागृती करा  | व्यापारी संघटनांची महापालिकेला सूचना 
Women Reservation Bill |  महिला आरक्षण विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर | महिला आरक्षण विधेयकाचा फायदा कोणाला होणार?

V Radha IAS  | पुणे महापालिकेच्या “या” कामाबाबत राज्याच्या अतिरिक्त सचिवानी केले कौतुक!

 

 

PMC Transgender Employees – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेने तृतीय पंथीयांसाठी केलेले प्रयत्न, त्यांना सुरक्षा विभागात कामं करण्यासाठी निर्माण केलेली संधी,  या महापालिकेच्या कामाबाबत राज्याच्या मुख्य अतिरिक्त सचिव डॉक्टर व्हि राधा अतिशय भारावून गेल्या. याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक देखील केले. (Pune Municipal Corporation – PMC)

 

राज्याच्या मुख्य अतिरिक्त सचिव डॉक्टर व्हि राधा  या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या प्रभाग रचना सुनावणीकरिता उपस्थित राहिल्या होत्या. त्यांना महानगरपालिकेने तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सुरक्षा रक्षकाचे काम सोपवले आहे, असे सांगितल्यानंतर त्यांनी आवर्जून मला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी मला संवाद साधायचा आहे असं सांगितलं. त्यानंतर सर्व तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांच्या समवेत संवाद साधण्याचा प्रसंग आला. (PMC Security Department)

व्ही राधा यांनी  यांनी सर्वांना स्टेज वर बोलावून त्यांचे कौतुक केले, त्यांनाच्याशी संवाद साधला.  समाजाच्या एका वंचित, दुर्लक्षित घटक साठी महापालिकेचा हा स्तुत्य उपक्रम व्ही राधा यांना विशेष भावला. असे महापालिका सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले.

दरम्यान महापालिकेने २५ तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना नोकरी दिली आहे. अजून ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना राहायला घरे देखील दिली जाणार आहेत. सुरक्षा विभाग या प्रस्तावावर काम करत आहे. असे देखील विटकर यांनी सांगितले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: