Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | उत्पन्न मर्यादेबाबत पुणे महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय 

HomeपुणेBreaking News

Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | उत्पन्न मर्यादेबाबत पुणे महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय 

Ganesh Kumar Mule Apr 28, 2023 2:00 PM

Contract workers | पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार
MLA Hemant Rasane | कचऱ्याची जागा घेत आहेत वारसा सांगणाऱ्या शिल्पकृती | आमदार हेमंत रासने यांचे ‘मिशन १०० दिवस’ सुरू
BARTI Pune Fellowship फेलोशिप बाबत बार्टीचा सकारात्मक प्रतिसाद ; पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित

शहरी गरीब वैद्यकीय योजना | उत्पन्न मर्यादेबाबत पुणे महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे महापालिकेच्या(PMC Pune )शहरी गरीब वैद्यकीय सहायता योजनेत(Urban poor medical support scheme) आता महापालिका प्रशासनाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी प्रशासनाने ऑनलाईन (Online) सुविधा तयार करत बोगस लाभार्थ्यांना लगाम घातला होता.  या योजनेत आता पर्यंत 1 लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादा (Income Limit) असलेल्या कुटूंबानाच सभासद होता येत होते. मात्र, ही उत्पन्न मर्यादा आता 1 लाख 60 हजार रूपये केली जाणार आहे. राज्यशासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या (Mahatma Jyotiba Phule Health scheme) धर्तीवर ही उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Pune Commissioner Vikram Kumar) यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference) सांगितले.

| पुणे महापालिकेची  शहरी गरीब योजना काय आहे? (what is PMC Punes Urban poor medical support scheme)

महापालिकेने 2008-09 पासून ही योजना सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य असले तरी, महापालिकेकडून केवळ वैद्यकीय केंद्र चालविले जातात. तर काही ठराविक दवाखाने वग़ळता महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रिया, उपचार, तपासण्या होत नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना खासगी दवाखान्यांमद्ये भरमसाठ पैसे मोजून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे नागरिकांसाठी पालिकेने 2008-09 पासून ही वैद्यकीय सेवा योजना सुरू केली आहे. त्यात, प्रमुख निकष संबधित कुटूंब महापालिका हद्दीतील असावे तसेच त्यांचे उत्पन्न 1 लाखांच्या आत असावे हे आहे. तर या योजनेसाठी महापालिकेने शहरातील खासगी रूग्णालयांचे पॅनेल तयार केले असून या रूग्णालयात या योजनेत 1 लाखांपर्यंतचे तर इतर काही आजारांसाठी 2 लाखांपर्यंत उपचार दिले जातात. मात्र, 1 लाखांच्यावर 1 रूपया अधिक उत्पन्न असले तरी अनेकांना आर्थिक दुर्बल असूनही उपचार मिळत नाहीत. त्यामुळे, पालिकेने आता उत्पन्न मर्यादा 1 लाख 60 हजार रूपये करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले. (Pune Municipal corporation Health scheme)


शहरी गरीब योजनेसाठी 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट होती. ती आता 1 लाख 60 हजार रुपये करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, पुढील काही दिवसात या निर्णयास मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल.

विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका