Union Budget 2025 | ‘सर्वसमावेशी आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करणारा अर्थसंकल्प’ – मुरलीधर मोहोळ

HomeBreaking News

Union Budget 2025 | ‘सर्वसमावेशी आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करणारा अर्थसंकल्प’ – मुरलीधर मोहोळ

Ganesh Kumar Mule Feb 01, 2025 8:22 PM

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!
Muralidhar Mohol | युद्ध हे हवेतून विमान परत आणण्या इतपत सोपी गोष्ट नाही | मराठा सेवा संघाने मुरलीधर मोहोळ यांच्या पोस्ट चा घेतला समाचार 
Vaccination For 15-18 years: 15 ते 18 वयोगटासाठी शहरात आता 40 लसीकरण केंद्रे : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Union Budget 2025 | ‘सर्वसमावेशी आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करणारा अर्थसंकल्प’ – मुरलीधर मोहोळ

Muralidhar Mohol – (The Karbhari News Servie) – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा (NDA Government) अर्थसंकल्प हा १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारा तर आहेच, शिवाय विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणाराही आहे. गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी (GYAN) या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवतानात या अर्थसंकल्पाला असलेला सर्वसमावेशी आणि दूरदर्शीपणा मोदी सरकाराच्या विकासाच्या धोरणांचे प्रतीक आहे. अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री यांनी व्यक्त केली आहे. (Budget 2025 News)

मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प हा १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारा तर आहेच, शिवाय विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणाराही आहे. गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी (GYAN) या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवतानात या अर्थसंकल्पाला असलेला सर्वसमावेशी आणि दूरदर्शीपणा मोदी सरकाराच्या विकासाच्या धोरणांचे प्रतीक आहे.

करप्रणालीमध्ये बदल करतानाच १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे हा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे मध्यमवर्गीय घटकाला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत नेणे, हाही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा अर्थसंकल्प सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्माणाला दिशा देणारा आहे.

समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यापासून तर उत्तम आरोग्य सुविधा, लघु उद्योगांचे सक्षमीकरण, विमा क्षेत्रातील गुंतवणूक आणि निर्यात धोरण या सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठीच्या योजना, एमएसएमई आणि महिला उद्योगांचे सक्षमीकरण, वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी उचललेली पावले आणि एआय प्रणालीला मिळणारे प्रोत्साहन याही महत्त्वाच्या बाबींना दिलेले स्थान मोदी सरकारची सर्वांगीन विकासाची कटिब्धता दर्शविते.

सर्वसमावेशी आणि दूरदर्शी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन !

करप्रणालीमध्ये बदल करतानाच १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे हा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे मध्यमवर्गीय घटकाला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत नेणे, हाही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा अर्थसंकल्प सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्माणाला दिशा देणारा आहे.

समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यापासून तर उत्तम आरोग्य सुविधा, लघु उद्योगांचे सक्षमीकरण, विमा क्षेत्रातील गुंतवणूक आणि निर्यात धोरण या सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठीच्या योजना, एमएसएमई आणि महिला उद्योगांचे सक्षमीकरण, वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी उचललेली पावले आणि एआय प्रणालीला मिळणारे प्रोत्साहन याही महत्त्वाच्या बाबींना दिलेले स्थान मोदी सरकारची सर्वांगीन विकासाची कटिब्धता दर्शविते.

सर्वसमावेशी आणि दूरदर्शी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन ! असे कौतुक मोहोळ यांनी केले.