महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता सुधारित दराने
: महापालिका प्रशासनाने सुरु केली अंमलबजावणी
एस -१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रू.२४,२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आर्हरित करणा-या बृहन्मुंबई नागरी समुह,नागपुर नागरी समुह व पुणे नागरी समुह मधील कार्यरत कर्मचा-यांना रू.२७००/- व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचा-यांना रू.१३५०/- इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील. निर्णयानुसार अंध,अस्थिव्यंगाने अधु आणि मणक्याच्या विकाराने पिडीत असणा-या तसेच मुकबधिर/श्रवण शक्तितील दोष असणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना सध्या अनुज्ञेय
असणा-या वाहतुक भत्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात आली आहे. अंध,अस्थिव्यंगाने अधु आणि मणक्याच्या विकाराने पिडीत असणा-या तसेच मुकबधिर/श्रवण शक्तितील
दोष असणा-या उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रू. २४,२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आर्हरित करणा-या बहन्मुंबई नागरी समुह,नागपुर नागरी समुह व पुणे नागरी समुह मधील कार्यरत कर्मचा-यांना रू. ५४००/- व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचा-यांना रू.२७००/- इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील..
अशा असतील अटी
२. ज्या कर्मचा-यांना पुणे महानगरपालिकेच्या वाहतुक सुविधा पुरविण्यात आली आहे त्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.तसेच वाहतुक भत्यांचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विदयमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील
३. रजा,प्रशिक्षण,दौरा इत्यादी कारणांमुळे संपूर्ण कॅलेडर महिन्यात अनुपस्थित असल्यास त्या महिन्यात हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही. सुधारीत दराने वाहतुक भत्ता माहे एप्रिल २०२२ चे वेतनात अदा करण्यात यावा. मे. राज्य शासनाकडील संदर्भ क्र. १ चे ज्ञापनानुसार पुणे महानगरपालिकेतील अधिकारी/सेवकांना दिनांक ०१.०४.२०२२ पासून सुधारीत दराने वाहतुक भत्ता आदा करणेस मा. महापालिका आयुक्त यांनी संदर्भ क्र.२ चे ठरावान्वये मान्यता दिली आहे.
वरील मान्यतेनुसार माहे एप्रिल २०२२ चे बिलामधून रक्कम आदा कराताना दरमहाच्या वाहतुक भत्त्याचा खर्च खात्याचे वेतन विषयक तरतूदीमधून करण्यात यावा. या कामी सुधारीत दराने वाहतुक भत्यांची नोंद सेवापुस्तकत ठेवण्यात यावी.
COMMENTS