Pune : Corona : आज पुण्यात नवे ३०६७ रुग्ण आढळले

HomeBreaking Newsपुणे

Pune : Corona : आज पुण्यात नवे ३०६७ रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 10, 2022 1:42 PM

Corona Report : Pune : आज पुण्यात नवे २१४१ रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ६२९९  रुग्ण आढळले
Pune : Corona Report : आज पुण्यात नवे ५७०५ रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे ३०६७ रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (सोमवार, १०  जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ३ हजार ०६७ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता १७ हजार ०९८ झाला आहे.

सोमवारी  पुण्यात ८५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १२९  वर गेली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील कॉलेजेसही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. दरम्यान आजपासून राज्यात काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे झाले आहे.

 

दिवसभरात ३०६७ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ८५७ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०२ मृत्यू.
-१४३ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १७
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १७
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५२९१०२.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७०९८.
– एकूण मृत्यू -९१२९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५०२८७५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १५१३९.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0