Hemant Rasne : Standing Commitee : स्थायी समिती बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या

HomeBreaking Newsपुणे

Hemant Rasne : Standing Commitee : स्थायी समिती बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या

Ganesh Kumar Mule Jan 25, 2022 4:15 PM

Standing Commitee : PMC : स्थायी समिती बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या
Hemant Rasane | Pune Lok Sabha | पुण्यात हेमंत रासने यांच्याकडून होणार 370 किलो पेढे वाटप! कसबा मतदारसंघात भाजपाकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी
Hemant Rasane : हेमंत रासने यांचे महापालिका आयुक्तांना पत्र!

दैनंदिन औषधे खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये

पुणे : आर्थिक दुर्बल घटक आरोग्य योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणार्या दैनंदीन स्वरुपातील औषधांसाठी दोन कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, आर्थिक दुर्बल घटकांसाठी काही औषधे किरकोळ स्वरुपात दररोज खरेदी करावी लागतात. प्रत्येक पुरवठाधारकांकडून किती औषधे खरेदी करायची याची स्वतंत्रपणे रक्कम नमूद करणे शक्य नसते. अशाप्रकारच्या खरेदीसाठी दोन कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यास मान्यता देण्यात आली.

—–

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा आणि चौशिंगा खंदक

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा आणि चौशिंगा खंदक उभारण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, झेब्रा खंदकासाठी सुमारे १ कोटी १३ लाख रुपये आणि चौशिंगा खंदकासाठी सुमारे १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. दोन्ही खंदक केंद्रीय प्राणीसंग्रहालयाच्या निकषांनुसार उभारण्यात येणार आहेत.

—–

लिक्विड ऑक्सिजन खरेदीला मान्यता

महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयातील मध्यवर्ती ऑक्सिजन कार्यप्रणालीसाठी लिक्विड ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, क्वॉलीजर्स सर्जिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली असून, पुढील दोन वर्षांच्या मुदतीसाठी सर्व करांसह रुपये २२.८५४१५ प्रती क्युबिक मीटर (आय. पी.) प्रमाणे २ लाख ४० हजार क्युबिक मीटरसाठी सुमारे ५४ लाख ८४ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

—–

सोनावणे रुग्णालयात जळीत आणि पक्षाघाताच्या रुग्णांसाठी सुपरस्पेशालिटी विभाग

पुणे महापालिकेच्या चंदुमामा सोनावणे रुग्णालयात जळीत आणि पक्षाघाताने आजारी असणार्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पुढील पंधरा वर्षांसाठी सुपरस्पेशालिटी विभाग चालविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या सुविधेचा शहरातील गरीब रुग्णांना फायदा होऊ शकेल. ही सुविधा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) एक टक्का कमी दराने पुरविली जाणार आहे. या विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री संबंधित स्वयंसेवी संस्थेचे माध्यमातनू पुरविली जाणार असून, अतिदक्षता विभागासाठी आवश्यक यंत्रसामुग्री महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

—–

बाणेर येथे मागासवर्गीय महिलांसाठी निवासी शिक्षण केंद्र

बाणेर येथे मागासवर्गीय आणि आदिवासी महिला-विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, मागासवर्गीय आणि आदिवासी महिला आणि विद्यार्थिनींसाठी बाणेर येथे निवासी शिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात शिक्षण घेणार्या आणि प्रशिक्षणार्थी महिलांना उपयोग होणार आहे. त्यासाठी सर्व करांसह सुमारे ९९ लाख रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

——

केशवनगर, मुंढवा रस्त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी

केशवनगर, मुंढवा येथील रेणुका माता मंदिरापर्यंतचा रस्ता विकसित करण्यासाठी सर्वकरांसह सुमारे चार कोटी रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

—-

आरटीई अंतर्गत दहावी पर्यंत विनामूल्य शिक्षण देण्याची शिफारस

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दहावी पर्यंत विनामूल्य शिक्षण देण्याची मुख्य सभेच्या मार्फत केंद्र सरकारला शिफारस करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, आरटीईअंतर्गत शहरातील शाळांमध्ये २५ टक्के जागा दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांसाठी राखीव असतात. या विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. सर्वसामान्य कुटुंबातील गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणे आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नाही. त्यामुळे या नियमात बदल करावा यासाठी केंद्र सरकारकडे मुख्य सभेची मान्यता घेऊन शिफारस करण्यात येणार आहे.

—–

नायडू, भैरोबा विभागातील मलवाहिन्या बदलण्यास मान्यता

मास्टर प्लॅननुसार नायडू आणि भैरोबा सिवेज डिस्ट्रिक्टअंतर्गत रस्त्यांवरील ६०० मिलीमीटर व्यासाच्या वरील मलवाहिन्या बदलण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, नायडू विभागासाठी सुमारे ११ कोटी ६७ लाख रुपये आणि भैरोबा विभागासाठी ११ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

—-

चांदणी चौकातील विद्युत केबल भूमिगत करण्यासाठी निधी

चांदणी चौकातील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणार्या ओव्हरहेड विद्युत केबल भूमिगत करण्यासाठी सुमारे ९२ लाख ५९ हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0