XE Variant : भारतात कोरोनाचा नवा XE व्हेरियंट नाही   : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण 

HomeBreaking Newsदेश/विदेश

XE Variant : भारतात कोरोनाचा नवा XE व्हेरियंट नाही  : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण 

Ganesh Kumar Mule Apr 06, 2022 4:20 PM

Pune : Corona : Active cases : शहरातील Active केसेस ११ हजाराच्या पार : आज नवे २४७१ रुग्ण मिळाले
Mask Wearing : DCM Ajit Pawar : बाबांनो कोरोनाला हलक्यात घेऊ नका  : मास्क न घालणाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला 
Pune : Corona : पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढता आलेख  : आज मिळाले 2284 पॉजिटीव्ह रुग्ण 

भारतात कोरोनाचा नवा XE व्हेरियंट नाही

: केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा नवा XE व्हेरियंट आढळून आल्याच्या बातम्यांचा केंद्र सरकारनं इन्कार केला आहे. यासंदर्भात आढळून आलेले पुराव्यांनुसार हा कोरोनाचा नवा व्हेरियंट असल्याचं स्पष्ट होत नाही, असं सरकारनं म्हटलं आहे.

 

सरकारी सुत्रांनी सांगितलं की, नमुन्यांच्या फास्ट क्यू सँपलला XE व्हेरियंट म्हटलं गेलं आहे, ज्याचं परिक्षण INSACOG नं (इंडियन सार्स कोव्ह २ जिनोमिक्स कन्सोर्टिअम) केलं आहे. ज्यांनी असा निष्कर्ष काढला की, या प्रकाराची जीनोमिक रचना ‘XE’ च्या जीनोमिक प्रतिमेशी जुळणारी नाही. त्यामुळं सध्या यासंबंधीचे जे पुरावे हाती आले आहेत त्यावरुन हा कोविडचा XE व्हेरियंट असल्याचं सिद्ध होत नाही.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिकेनं आज माहिती देताना सांगितलं होतं की, नमुन्यांच्या नियमित चाचणीदरम्यान आढळून आलं की, एक रुग्ण हा कोविडच्या Kappa व्हेरियंटन तर आणखी एक रुग्ण XE व्हेरियंटन बाधित आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही नुकतंच हे जाहीर केलं होतं की, युकेमध्ये XE नावाचा व्हेरियंट आढळून आला असून हा ओमिक्रॉन व्हेरियंटपेक्षा दहापट अधिक संसर्गजन्य आहे. दरम्यान, व्हायरॉलॉजिस्टनं सांगितलं होतं की, जर कोविडच्या नियमांचं तंतोतंत पालन केलं तर ओमिक्रॉन हा वेगानं पसरणारा असला तरी त्यामुळं भारतात कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0