पुणे महापालिका आवारात विद्युत चोरी | ऋषिकेश बालगुडे यांचा आरोप
पुणे | पुणे महापालिका आवारात विद्ईयुत चोरी होत असल्याचा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी केला आहे. याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बालगुडे यांनी केली आहे.
बालगुडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार महानगरपालिका वतीने मोटार वाहन विभाग मार्फत ई मोटार वाहने भाड्याने घेण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या होत्या. चिनू ट्रेव्हलस या ठेकेदारला टेंडर दिले गेले. यानंतर त्यांना विद्दुत विभागाने आयुक्त यांच्या मान्यतेनुसार मनपा इमारती मध्ये चारचाकी वाहने ई व्हेईकल चार्जिंग स्टेशन साठी जागा भाड्याने देण्यासाठी भूमी मालमत्ता व्यवस्थापन ला पत्र पाठवले. साधारण गेले १ वर्षभर ठेकेदार यांना जागा देण्यासाठी कोणताही पत्र व्यवहार केला नाही. तसेच विद्दुत विभागाने व्हेईकल डेपो ला कळविले नाही. यात ठेकेदार यांनी सुद्धा व्हेइकल विभागाला कळविणे भाग होते. मनपा भूमी जिंदगी विभागाचा कोणताही करारनामा झाला नसल्याचे समजते. बेकायदा विद्दुत कनेक्शन चिनू ट्रेव्हलस ठेकेदाराने पुणे मनपा मुख्य आवारातील पार्किंग मध्ये घेतले आहे. त्यातून अनेक महिने बेकायदारित्या चारचाकी वाहने चार्जिंग करत आहे. विद्दुत विभाग अधिकारी वाईकर यांना समक्ष हि घटना आज निदर्शंनास आणून दिली आहे. बेकायदा विद्युत चोरी केली महानगरपालिका आवारात होत असेल हि गंभीर बाब आहे..या बाबत त्वरीत विद्युत चोरी बाबत गुन्हा दाखल करावा. व विद्युत भाडे वसूल करणायत यावे. मनपा जागेमध्ये काही आपत्कालीन घटना ई व्हेईकल चार्जिंग बाबत घडली यास जवाबदार कोण?
या ठेकेदारचा तात्काळ ठेका रद्द करावा. कोणत्याही प्रकारची मुदत वाढ देण्यात येऊ नये. नव्याने या बाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. आपल्याला या आधी ३१-१-२०२३ रोजी निवेदन देण्यात आले आहे.तरी याची कारवाई अहवाल प्राप्त व्हावा. अशी मागणी ऋषिकेश बालगुडे यांनी केली आहे.