आज ही सादर होऊ शकले नाही प्रारूप प्रभाग रचनेचे सादरीकरण
: पुढील आठवड्यात निवडणूक आयोग नवीन तारीख देणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी असेल याची प्रतीक्षा काही केल्या संपेना. पुण्याच्या प्रारूप प्रभाग रचनेचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. पुन्हा एकदा यास मुदतवाढ देण्यात आली होती. १५ जानेवारी पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आज म्हणजेच १५ जानेवारी ला देखील ही रचना सदर होऊ शकली नाही. याबाबत महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले कि पुढील आठवड्यात निवडणूक आयोगा कडून नवीन तारीख मिळेल. त्यानुसार ही रचना सादर केली जाईल.
शासनाने दि. १५ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पध्दत) नियम, २०२१ अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार (त्रिसदस्यीय) आरक्षण कशा पध्दतीने निश्चित करावे हे विहित केले आहे
निर्णयास अनुसरुन जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही तोपर्यंत आगामी सार्वत्रिक / पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत.
दरम्यान पुण्याच्या प्रभागाच्या प्रारूप आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेशराज्य निवडणूक आयोगाने दिला होता. मात्र पुन्हा एकदा यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत रचनेचे सादरीकरण करावे लागणार होते. मात्र आज ही ते होऊ शकले नाही. याबाबत महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले कि पुढील आठवड्यात निवडणूक आयोगा कडून नवीन तारीख मिळेल. त्यानुसार ही रचना सादर केली जाईल.
: रचनेतील बदल भाजपला सोयीचे असल्याने होतोय उशीर
महापालिका प्रशासनाने ६ डिसेंबर रोजी कच्चा आरखडा आयोगाला सादर केला होता. अहवाल सादर करण्याच्या शेवटच्या दिवसात मोठे बदल करण्यात आले होते. सर्वच पक्षातील मातब्बर नगरसेवकांसाठी प्रभाग रचना अनुकूल झाल्याचीही चर्चा होती. शहरातील सर्व ५८ प्रभागांचे सादरीकरण केले होते. यामध्ये प्रभागांची सीमा, लोकसंख्या यासह इतर तांत्रिक माहिती देण्यात आली होती. हे सादरीकरण झाल्यानंतर प्रारूप रचनेत काही ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे असे निरीक्षण आयोगाने नोंदविले होते. त्यानुसार २४ बदल करण्यास सांगितले होते. मात्र हे बदल केले तर महाविकास आघाडीला अडचणीचे होईल, त्यामुळे हे बदल करण्यास उशीर केला जात आहे. कारण हे बदल भाजपला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे रचना सादर करण्यास उशीर होत आहे. अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
: उपायुक्त अजित देशमुख एका राजकीय नेत्याच्या फार्म हाउस वर : उज्वल केसकर
दरम्यान महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते उज्वल केसकर यांनी आरोप केला आहे कि महापालिकेचे उपायुक्त अजित देशमुख हे एका राजकीय नेत्याच्या फार्म हाउस वर प्रभाग रचनेचे नकाशे घेऊन बसले आहेत.
दरम्यान प्रभाग रचनेबाबत देशमुख यांना पत्रकारांनी विचारले असता, देशमुख यांनी सांगितले कि सोमवारी कार्यालयीन वेळेत प्रभाग रचने बाबत माहिती दिली जाईल.
COMMENTS