15 मार्च नंतर पथ विभाग बिले स्वीकारणार नाही
: परिमंडळे आणि क्षेत्रीय कार्यालयांना पथ विभागाचे निर्देश
: असे आहेत आदेश
मुख्य अभियंता ( पथ ), पुणे महानगरपालिका कार्यालयामार्फत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पथ विषयक विविध कामकाज करणेत येते. सदर कामांकरीता मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयास प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकामधून आवश्यक तरतुद उपलब्ध करून देणेत येत असते. उपआयुक्त, परिमंडळ क्रमांक – 1 ते 5 व त्यांचे नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालय व पुणे महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांमार्फत त्यांचेकडील कामांकरीता आवश्यक तरतुदीची मागणी प्राप्त झालेस व मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयाकडे उपलब्ध तरतुद विचारात घेवून तसेच मागणी करणेत आलेल्या कामाची आवश्यकता व निकड़ विचारात घेवून मा.वितीय समितीची मान्यता प्राप्त असलेल्या कामांनाच पथ विभागाकडील संबंधित कार्यक्षेत्रातील कार्यकारी अभियंता ( पथ ) व अधिक्षक अभियंता ( पथ ) यांचे शिफारसीनंतर माझे स्वाक्षरीने उपलब्ध मंजूर करणेत आलेले आहे. त्यानुसार, याव्दारे सुचित करणेत येत आहे की, मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयामार्फत अदा करावयाचे बीले विचारात घेता इकडील कार्यालयाकडून उपआयुक्त, परिमंडळ क्रमांक – 1 ते 5 व त्यांचे नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालय तसेचnइतर पुणे महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांकडील ज्या कामांना लॉकींग उपलब्ध करून देणेत आले आहेत अशा कामांची बीले SAP प्रोग्रॅममधील ससा काढून, खर्चाच्या नोंदी घेवून सादर करणे बंधनकारक असलेने याकामी आवश्यक कालावधीचा विचार करता दिनांक – 15 मार्च 2022 पुर्वी सदर बीले मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयाकडे सादर करणेत यावीत. दिनांक – 15 मार्च 2022 नंतर कोणतीही बोले मुख्य अभियंता ( पय ) कार्यालयाकडे स्विकारणेत येणार नाहीत, याबाबत सर्व संबंधितांनी स्पष्ट नोंद घ्यावी. भविष्यात सदर बीलांना तरतुद उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयाची राहणार नाही याबाबत याव्दारे सर्व संबंधितांना याव्दारे कळविणेत येत आहे.
COMMENTS