PMC Commissioner | 24 मार्च पर्यंत बिले सादर करता येणार   | महापालिका आयुक्तांकडून 9 दिवसाची मुभा

HomeपुणेBreaking News

PMC Commissioner | 24 मार्च पर्यंत बिले सादर करता येणार | महापालिका आयुक्तांकडून 9 दिवसाची मुभा

Ganesh Kumar Mule Mar 16, 2023 3:13 AM

GST : PMC : Audit : GST लागू नसताना GST लावत  सादर केली जातात बिले  : महापालिकेच्या विभिन्न खात्यांचे प्रताप 
PMC Pune | First installment | 7 व्या वेतन आयोगातील पहिल्या हफ्त्याची रक्कम देण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु! | २० तारखेपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता
Bills : Road Department : V G Kulkarni : 15 मार्च नंतर पथ विभाग बिले स्वीकारणार नाही 

24 मार्च पर्यंत बिले सादर करता येणार

| महापालिका आयुक्तांकडून 9 दिवसाची मुभा

पुणे – महापालिकेच्या विविध विभागाकडून आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असतानाही अखेरच्या दिवसापर्यंत कामाची बिले सादर करतात. यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च झालेला दिसतो. हे प्रकार बंद करण्यासाठी १५ मार्च पर्यंत बिल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र ही अट शिथिल करण्यात आली असून, आता २४ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune)!

३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपते, त्यापूर्वी चालू वर्षातील कामाचे बिल सादर करून ते मंजूर करून घेणे आवश्‍यक असते. अन्यथा ठेकेदार अडचणीत येतात. दरवर्षीचा हा गोंधळ लक्षात घेऊन यंदा १५ मार्च पर्यंत अंतिम बिल सादर करा असे आदेश देण्यात आले होते. पण यंदाही अनेक विभागाची बिले सादर झालेली नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून मुदतवाढीची मागणी विभागप्रमुखांकडे केली जात होती. त्यापार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी  ९ दिवसांची मुदत दिली असून, २४ मार्च पर्यंत बिल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान बिले सादर करताना सर्व कागदपत्रासहित सादर करावीत. अपूर्ण कागदपत्रामुळे बिल सादर करण्यास उशीर झाला अथवा तरतूद लॅप्स झाली तर त्याची सगळी जबाबदारी ही खाते प्रमुखाची असेल. असे ही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)