Rescue : ओढ्यात पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर

HomeBreaking Newsपुणे

Rescue : ओढ्यात पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर

Ganesh Kumar Mule Oct 17, 2021 6:58 AM

Big Breaking News : Nawab Malik : ED : मोठी बातमी:  ईडीने नवाब मलिकांना घेतले ताब्यात 
schools Holidays | जिल्ह्यातील ५ तालुके वगळता इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी
PMC : Health scheme : शहरी गरीब योजनेची 45 कोटींची तरतूद संपली : 3 कोटींचे वर्गीकरण करण्यास स्थायीची मान्यता

ओढ्यात पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर

पुणे  : घोरपडी  येथील श्रीनाथ भाजी मंडईच्या मागे असलेल्या ओढ्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. घोरपडीमध्ये राहणारे बबन चोरगे अचानक ओढ्यात पडले होते. एक तासाच्या अथक प्रयत्नांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले.

ओढा २० ते ३० फूट खोल

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक वयस्कर व्यक्ती पाय घसरुन पडली. बाहेर पडण्यास मार्ग नसल्यामुळे जवळपास एक तास चोरगे ओढ्यामध्ये अडकून पडले होते. अखेर सात वाजता त्या रस्त्यावरून जाणा-या एका व्यक्तीला ओढ्यातून वाचवा वाचवा आवाज ऐकू आला. त्यामुळे आजूबाजूला लोक जमले त्याला ओढ्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर काढण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांनी स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाला संपर्क केला.काही वेळातच जवान घटनास्थळी पोहचले व शर्थीचे प्रयत्न करुन त्या व्यक्तीला ओढ्याच्या बाहेर काढले. ओढ्यात पडल्यामुळे चोरगे अतिशय घाबरला होते. ओढा २० ते ३० फूट खोल असल्याने त्या व्यक्तीला शिडीच्या साहाय्याने फायरमन महेंद्र महामुनी खांद्यावर बसून बाहेर काढले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलातील इमरान तांबोळी, तांडेल दिपक बद्दलवार, फायरमन अभिजीत घुमटकर, महेंद्र महामुनी, सिद्धी गिलबिले, पंकज रसाळ, अजय इथापे यांनी ही कामगिरी केली.चोरगे यांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे स्थानिक नागरिक चंदू खुनेकरी, योगेश घोडके दिपक फडतरे इतरांनी अग्निशमन दलाच्या जवानांचा सत्कार केला व त्यांचे आभार मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0