शाळा विलीनीकरण विषयावरून सभागृह तापले
: सभागृह नेते विरुद्ध सर्व विरोधी पक्ष
पुणे : शाळा विलीनीकरण या विषयावरून सोमवारी मुख्य सभेत वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. आमची सत्ता असताना आम्हीच जास्त काम केले, असे सभागृह नेता गणेश बिडकर यांनी आपल्या भाषणात सांगितल्याने सर्व विरोधी पक्ष कामाचे पुरावे मागू लागले. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ गंभीर झाले होते. मात्र महापौरांनी यात मध्यस्थी करत यावर पडदा टाकला.
: महापौरांची मध्यस्थी कामास
सोमवारच्या मुख्य सभेत शहरातील काही शाळांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव अलाल होता. ज्या शाळामध्ये पट कमी आहे, अशा शाळांचे विलीनीकरणा करण्याचा हा प्रस्ताव होता. याबाबत सर्व पक्षीय नगरसेवकांची भाषणे झाली. सर्वानीच शाळांचा दर्जा सुधारण्याची मागणी केली. तर काहींनी आताच विलीनीकरण न करता पुढील वर्षी विलीनीकरणा करण्याची मागणी केली. त्यानंतर सभागृह नेता गणेश बिडकर यांचे भाषण झाले. मात्र या विषयावरून सोमवारी मुख्य सभेत वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. आमची सत्ता असताना आम्हीच जास्त काम केले, असे सभागृह नेता गणेश बिडकर यांनी आपल्या भाषणात सांगितल्याने सर्व विरोधी पक्ष कामाचे पुरावे मागू लागले. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ गंभीर झाले होते. मात्र महापौरांनी यात मध्यस्थी करत यावर पडदा टाकला. त्यांनतर सभागृह शांत झाले. शिवाय हा विषय देखील मंजूर करण्यात आला.
—
महानगरपालिकेच्या शाळांचे विलिनीकरण करणे ही गोष्ट काही भूषणावह नाही. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने उर्वरीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी प्रशासनाने हा प्रस्ताव ठेवला होता. यापुढील काळात असे प्रस्ताव मान्यतेसाठी येऊ नयेत, यासाठी पालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा कसा सुधारता येईल यासाठी प्रयत्न करावे. पालिका शाळेतील शिक्षकांना अद्यावत प्रशिक्षण देऊन शाळांमधील पटसंख्या कशी वाढेल, याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
COMMENTS