महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळेल
: माजी आमदार मोहन जोशी
पुणे : काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि उत्साह पाहता येत्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.
महापालिका प्रभाग रचना आज सोमवारी जाहीर झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना मोहन जोशी म्हणाले, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आमदार संग्रामदादा थोपटे आणि आमदार संजयजी जगताप यांचे भरीव कार्य आहे, त्यामुळे भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागांमध्ये कॉंग्रेस पक्ष आघाडी घेईल. याखेरीज गेले वर्षभर काँग्रेसचे कार्यकर्ते आपापल्या प्रभागात, कार्यक्षेत्रात उत्साहाने काम करीत आहेत. पक्षाने जाहीर केलेली आंदोलने यशस्वी झाली आहेत. पुणेकरांचे प्रश्न मांडण्यात काँग्रेस आघाडीवर राहिली आहे. काँग्रेसचे नेते कन्हैयाकुमार यांच्या सभेला तरुणाईने गर्दी केली होती, ही बदलती स्थिती पाहता काँग्रेस सहजपणे मोठा विजय संपादन करेल.
महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेला भारतीय जनता पक्ष पुणेकरांसाठी एकही ठोस काम करू शकलेला नाही. नादुरुस्त रस्त्यांमुळे पुणेकर संतप्त आहेत. भाजपच्या कारभाराविषयी नैराश्य आल्याने पुणेकर पुन्हा कॉंग्रेसला साथ देईल, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS