40% कर सवलतीबाबत उद्या मुख्यमंत्री घेणार बैठक
| PMPML च्या काही विषयांवर देखील होणार चर्चा
पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी राज्य सरकारकडे सातत्याने करण्यात येत आहे. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात येत आहे. याबाबत भाजपकडून मागणी करण्यात आली होती. तसेच महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानुसार या दोन्ही मागण्यांसदर्भात उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मिळकत करातील ४०% सवलत दि. १/८/२०१९ पासून स्व: वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च दि. १/४/२०१० पासून १५% हून १०% फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा दोन मागण्या भाजपकडून करण्यात आल्या आहेत.
‘निवासी मिळकतींना देण्यात येणारी ४०% सवलत आणि १५% हून १०% देखभाल दुरुस्ती खर्च नवीन आकारणी होत असलेल्या मिळकतीना दिनांक १/४/२०१९ पासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१९ आणि २०२२ ला महापालिकेच्या मुख्य सभेचा पुन्हा ठराव केला होता. त्याद्वारे हीसवलत रद्द न करता सुरू रहावी, असा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याला होता. मात्र सरकारने कोणाताही निर्णय घेतला नाही’. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच पुणेकर नागरिकांकडून देखील मागणी करण्यात येत होती.
त्यानुसार मुख्यमंत्री दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता ही बैठक होईल. यासाठी महापालिका आयुक्त यांना माहिती देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. त्यानुसार टॅक्स विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मिळकत करासोबत पीएमपीच्या प्रश्नाबाबत देखील चर्चा होणार आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.