विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची क्षमता | डॉ. संजय ढोले
“विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची ताकद असते. विज्ञान कथा, विज्ञान लेख,विज्ञान कादंबरी,विज्ञान विषयक लेखन इत्यादींमुळे मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत आहे. वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग प्रस्थापित विज्ञानावर आधारित असतात. असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.संजय ढोले (भौतिक शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे, बुधवार दि.१५ मार्च २०२३ रोजी “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत “मराठी विज्ञान कथा स्वरूप व संकल्पना या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.संजय ढोले (भौतिक शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
ते आपल्या मनोगतात म्हणाले, “विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची ताकद असते. विज्ञान कथा, विज्ञान लेख,विज्ञान कादंबरी,विज्ञान विषयक लेखन इत्यादींमुळे मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत आहे. वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग प्रस्थापित विज्ञानावर आधारित असतात. म्हणून विज्ञान कथा लिहिताना प्रस्थापित विज्ञानाला धक्का लागता कामा नये. विज्ञान कथेतील कथा काल्पनिक व विज्ञान मात्र सत्य असते.”
ढोले सरांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
पाहुण्यांचा परिचय डॉ.अजय कवाडे व प्रास्ताविक डॉ.वसंत गावडे यांनी केले. ते म्हणाले “ढोले सरांचे लेखन म्हणजे विज्ञान साहित्यातील एक मैलाचा दगड म्हणून त्याची नोंद साहित्याच्या इतिहासामध्ये घेतली आहे.” सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी भूषविले, ते आपल्या मनोगतात म्हणाले,”माणूस जीवन जगत असताना तो विज्ञानाला अनुसरूनच आपली प्रत्येक कृती करत असतो.”
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एफ.ढाकणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे,डॉ. सुनिल लंगडे,डॉ.किशोर काळदंते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.छाया तांबे यांनी केले. आभार डॉ.के.डी सोनावणे यांनी मानले.