डॉक्टर्स डे निमित्त दहा कोरोना योद्धा डॉक्टर्स चा सन्मान
पुणे | रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी कोरोनाकाळातसुद्धा देवदूताची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर्स चा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. शुक्रवारी ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने कोथरुड परिसरातील दहा डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला गेला, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.
‘कोरोनाच्या काळात रात्रंदिवस रुग्णसेवेचे व्रत जपणारे डॉक्टर्स देवदूतच आहेत. त्यांच्या कौशल्याने आणि ज्ञानाने अनेकांना जीवनदान मिळाले. कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांवर उपचार करून आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा सन्मान केला गेला असे कोथरूड राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले.
डॉक्टर्स डे चे औचित्य साधून अशा कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टर करत असलेल्या कष्टाच्या बळावरच कोरोनाचा लढा आपण यशस्वीपणे लढत आहोत, त्यांच्या या सेवेला सलाम!’, असे गिरीश गुरनानी म्हणाले.
डॉक्टर डे निमित्ताने कोथरूड परिसरातील डॉ. सुहास नेने,डॉ. सुरेश बोरकर, डॉ.अशोक सोहोनी, डॉ.मिताली कुलकर्णी, डॉ.समीर नारकर, डॉ. विजय तरटे, डॉ स्वाती सुराणा, डॉ. एस.एम.भाटे,डॉ बी. एम. गदादे,डॉ. मीना पाटील या डॉक्टरांचा सन्मान केला. सन्मानचिन्ह आणि शाल असे सत्काराचे स्वरूप होते.
यावेळी ऋषिकेश कडू, सुनील हरळे, ऋषिकेश शिंदे,तेजस बनकर,पृथ्वी दहीवाळ आदि उपस्थित होते.