मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढूनही टॅक्स विभाग 7 कोटींची वसुली करण्याबाबत उदासीन
| टॅक्स विभागाने खुलासा देखील नाही केला
स्थायी समितीत सादर करण्यात आलेल्या ऑडिट अहवालानुसार कर आकारणी व कर संकलन खात्याकडील पेठ लोहगाव सन २०१८-२०१९ व २०१९-२०२० A फॉर्म आकारणी रजिस्टरची तपासणी मुख्य लेखापरीक्षक कार्यालय यांच्याकडून करण्यात आली. यामध्ये काही आक्षेपार्ह व दोषास्पद बाबी आढळून आल्या. पेठ लोहगाव सन २०१८-२०१९ व २०१९ २०२० A फॉर्म रजिस्टरची तपासणी करीत असताना पी/१/०९/०४१४६००० या मिळकतीवर ६,४९,०४,८००/. थकबाकी दिसून आली. याबाबत खात्यास कळवून त्यावरील खुलासे १५ दिवसांचे आत पाठविणेबाबत कळविले होते. कर आकारणी व कर संकलन प्रमुख कार्यालयाकडे सदरची वसूल पात्र रक्कम आपल्या नियंत्रणाखालील पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षक यांना वसूल करण्याचे आदेश देण्यास व सदरची रक्कम वसूल केल्याबाबत आमच्या कार्यालयाकडे कागदपत्राधारे कळविण्यात यावे असे कळविले होते. परंतू कर आकारणी व कर संकलन कार्यालयाने अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने सदरचा अहवाल स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे.
A /००००२५, A /००००३०, A /००१५३४ सन २०१८-१९ या मिळकतीच्या आकारणी प्रकरणाची व तद्नुषंगिक कागदपत्रांची तपासणी केली असता आक्षेपार्ह व दोषास्पद बाबींमुळे वसूलपात्र रक्कम रुपये
५१,७१,८०६/- वसूल करावयाची आहे.