Taljai Biodiversity : काँग्रेस गटनेता आबा बागूल यांच्या कुठल्या प्रकल्पाच्या प्रयत्नांना मिळाले यश?

HomeपुणेPMC

Taljai Biodiversity : काँग्रेस गटनेता आबा बागूल यांच्या कुठल्या प्रकल्पाच्या प्रयत्नांना मिळाले यश?

Ganesh Kumar Mule Sep 18, 2021 11:57 AM

Green Hydrogen Policy | PMC Pune | हरित हायड्रोजन धोरणा बाबत राज्य सरकारने पुणे महापालिकेकडून मागवला अभिप्राय!
PMC Contract Employees | पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी!
Pune Municipal Corporation | वकीलपत्रावर सही शिक्का मारण्याबाबत खातेप्रमुख उदासीन  | प्रशासनाला द्यावे लागले आदेश 

107 एकरवर जैवविविधता वसुंधरा प्रकल्प प्रशासनाकडून मान्य

: स्थायी समितीस सादर

: आबा बागुलांच्या प्रयत्नांना अखेर यश

पुणे: ‘पुण्याच्या सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकर जागेवर नियोजित केलेल्या जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास पुणे महानगरपालिका प्रशासनाने त्याचा सूक्ष्म प्रकल्प अहवाल (डीपीआर) पुणे महानगरपालिका स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला.’ त्यामुळे आता या प्रकल्पास गती येऊन तळजाई टेकडीवर नंदनवन फुलेल, नागरिकांना मोठ्या सुविधा उपलब्ध होतील आणि शेकडो कुटुंबांना रोजगार मिळेल, असा विश्वास व्यक्त करून या नियोजित प्रकल्पास सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष मंजुरीसाठी सहकार्य करतील असा विश्वास पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटेनेते आबा बागुल यांनी व्यक्त केला.

: 2018 मध्ये सादर केला होता आराखडा

तळजाई टेकडीच्या विकासाचा प्रकल्प आराखडा ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी 2018 मध्ये पुणे महानगरपालिका प्रशासनास सादर केला होता व या नियोजित प्रकल्पाच्या आराखड्याचेही सादरीकरण केले होते. तेथे त्यातील स दु शिंदे क्रिकेट स्टेडियम साकारण्यात आले.  मात्र, विविध हितसंबंधी राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप आणि करोना परिस्थिती त्यामुळे हा प्रकल्प लांबत चालला होता. त्यास आता प्रशासनाने डीपीआर म्हणजे सूक्ष्म नियोजन प्रकल्पास मान्यता देऊन व स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला आहे ही समाधानाची बाब आहे, असे आबा बागुल म्हणाले.
तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकर जागेवरील सुमारे 120 कोटी रुपये खर्च अपेक्षित असणारा हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक प्रकल्प टप्प्याटप्प्याने आगामी काळात पूर्ण होणे अपेक्षित आहे असे सांगून आबा बागुल म्हणाले की, तळजाई टेकडीवर पाच एकर जागेत भव्य क्रिकेट स्टेडियमचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत 26 नोव्हेंबर 2018 रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. काही राजकीय विरोधकांनी या प्रकल्पात अडथळे आणल्यामुळे व करोना संकटकाळामुळे पुढे ढकलला गेलेला हा प्रकल्प आता सर्वच पक्षांच्या मदतीने व सहकार्याने मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या संदर्भात झालेल्या बैठकीत हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक प्रकल्प वेगाने मार्गी लागण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे त्यांनी अधिकृत शासकीय बैठकीत नमूद केले होते. त्याचा संदर्भ देऊन आबा बागुल म्हणाले की, त्यामुळे देखील हा प्रकल्प वेगाने पूर्ण होईल त्याबाबत प्रशासनाला सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

: काय आहे प्रकल्पात?

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात विविध संकल्पनांवर आधारित सात उद्याने असणार असून त्यामध्ये नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, औषधी वनस्पतींचे उद्यान, सुगंधी वनस्पतींचे उद्यान, रानमेवा उद्यान, मसाला पदार्थ उद्यान आणि पुष्प उद्यान अशा सात उद्यानांचा समावेश आहे. याबरोबरच देशी वृक्षांची लागवड व संगोपन, पक्षी निरीक्षण केंद्र, सायकल ट्रॅक, मुलांवर अधिक संस्कार करण्यासाठी गुरुकुल पद्धतीची ग्रीनशाळा, भव्य क्रिकेट स्टेडियम, सुंदर जॉगिंग ट्रॅक, महिलांसाठी स्वतंत्र क्रीडांगण, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, इको बाजार, निसर्ग म्युझियम, ग्रे वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, 300 किलोवॉट वीजनिर्मिती करणारा सोलर रूफ पॅनेल प्रकल्प, सेंद्रिय शेतीचे माहिती देणारा पथदर्शक प्रकल्प, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स, पॅगोडा,  नर्सरी, ई-रिक्षा आणि भव्य पार्किंग व्यवस्था ही सारी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये असतील. सुमारे 107 एकर जागेत पसरलेला हा प्रकल्प आगामी काळात टप्प्याटप्प्याने विकसित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करून महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या या डीपीआरला मान्यता देऊन मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविल्याबद्दल त्यांंनी मनपा आयुक्त व प्रशासनाचे आभार मानले. तसेच स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष पुण्याच्या विकासासाठी हा दुरदृष्टीतून तयार होणारा प्रकल्प होण्यासाठी हातात हात घालून काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0