Talathi Exam | स्पर्धा परीक्षेत गैरप्रकारास  वाव नाही, अफवा पसरवू नये | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

HomeBreaking Newssocial

Talathi Exam | स्पर्धा परीक्षेत गैरप्रकारास वाव नाही, अफवा पसरवू नये | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ganesh Kumar Mule Aug 19, 2023 4:23 PM

Mahavikas Aaghadi | पुणेकरांना मिळकतकरात 40 टक्के सवलत कायम ठेवावी आणि शास्ती कर रद्द करावा | विधी मंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन
Cabinet Meeting Decision | आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या
Ajit Pawar | Rajgad | पुणे जिल्हयातील या तालुक्याचे नामांतरण “राजगड” करण्याची अजित पवारांची मागणी 

Talathi Exam | स्पर्धा परीक्षेत गैरप्रकारास  वाव नाही, अफवा पसरवू नये | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Talathi Exam |  राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी (Talathi Exam) पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे. (Talathi Exam)
नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आणि त्यांच्याकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त केले आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Nashik Talathi Exam)
पूर्वीच्या काळात अशा स्पर्धा परीक्षांत काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. आणि म्हणूनच राज्य शासनाने टीसीएस आणिआयबीपीएस या कंपन्यांकडून या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संस्था काटेकोरपणे या परीक्षा घेतील. राज्य शासनाचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.
——
News Title | Talathi Exam | There is no scope for malpractice in the competitive examination, no rumor should be spread Chief Minister Eknath Shinde