VadgaonSheri Constituency | वडगाव शेरी मतदारसंघातील बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करा  | आमदार सुनिल टिंगरे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

HomeBreaking Newsपुणे

VadgaonSheri Constituency | वडगाव शेरी मतदारसंघातील बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करा | आमदार सुनिल टिंगरे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ganesh Kumar Mule Jun 09, 2023 12:30 PM

Bank employees strike| महत्वाची कामे उरकून घ्या | बँक कर्मचाऱ्यांचा ‘5-डे वीक’च्या मागणीसाठी संप | तीन दिवस बँका राहणार बंद
Nana Bhangire | ढाल-तलवार तळागाळापर्यंत पोहोचवणार | पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची पहिली प्रतिक्रिया 
Cabinet Decision | मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय

VadgaonSheri Constituency | वडगाव शेरी मतदारसंघातील बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करा

| आमदार सुनिल टिंगरे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

VadgaonSheri Constituency |वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील (VadgaonSheri Constituency) अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh kumar) यांच्याकडे केली आहे. यावेळी आयुक्तांनी यासदर्भात तात्काळ कारवाईची मोहीम राबविण्यात येईल असे आश्वासन दिले. (VadgaonSheri Constituency)


आमदार टिंगरे यांनी कल्याणीनगर परिसरातील नागरिकांसह पोलिस आयुक्त कुमार यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्ताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विमाननगर, कल्याणीनगर, खराडी, लोहगाव तसेच विश्रांतवाडीसह अन्य भागात मोठ्या प्रमाणात पब, टेरेस (रुफटफ) हॉटेल अनधिकृतरित्या सुरु आहेत. हे पब आणि हॉटेल रात्री उशिरापर्यत सुरु असतात. त्याठिकाणी सुरु असलेल्या कर्णकर्कश साउंड सिस्टीमचा या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच हॉटेल/पब मध्ये तरुणवर्ग मद्यधुंद होऊन बाहेर पडतो. त्यामुळे अनेकदा अनुसुचित घटना घडतात. तसेच अनेक ठिकाणी बेकायदा दारू विक्री, हुक्का पार्लर, मटका धंदा, पत्याचे क्लब, अमली पदार्थ विक्री, मसाज पार्लर व लॉज गैरप्रकार चालू आहेत. या सर्व अनधिकृत हॉटेल, पब व बेकायदा व्यवसायावर त्वरित कारवाई करण्यात यावी. पोलिसांनी याबाबत कारवाईस टाळाटाळ केल्यास विधी मंडळाच्या पावसाळी अशिवेशनात या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधू असेही आमदार टिंगरे यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांच्या समवेत कल्याणीनगर येथील रचना अग्रवाल, इक्बाल जाफर, मोनिका शर्मा, सुमित कर्णिक, मुनीर वसतांनी, किरण म्हलोत्रा, निलेश चौहान, सचिन आगाशे आदी नागरिक उपस्थित होते.


News Title | Take action against illegal business in Vadgaon Sheri Constituency | MLA Sunil Tingre’s request to the Commissioner of Police