Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

HomeBreaking Newsपुणे

Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

गणेश मुळे Feb 26, 2024 1:01 PM

Savarkar Jayanti | Pune News | पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली कशी आहे? जाणून घ्या 
Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रम
Pune Hindi News | Savarkar Jayanti | पुणे के फर्ग्यूसन कॉलेज में स्वातंत्र्यवीर सावरकर का कमरा कैसा है?  जान लो 

Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

 

Swatantra Veer Savarkar | स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या 59 व्या पुण्यतिथीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Fergusson College Pune) वसतिगृहातील त्यांचे वास्तव्य असणाऱ्या खोलीत अभिवादनासाठी नागरिकांची रीघ लागली होती.

डीईएसचे माजी अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्रबंधिका डॉ. सविता केळकर, संचालक मिलिंद कांबळे, अनिल भोसले, प्रा. प्राजक्ता प्रधान, प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. प्रकाश पवार, प्रा. सुभाष शेंडे, प्रा. नारायण कुलकर्णी, डॉ. आनंद काटिकर, श्रध्दा कानेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रवास या खोलीत चित्रबद्ध करण्यात आला होता. पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठाची डी. लिट. पदवी स्वीकारताना सावरकरांनी परिधान केलेला झगे आणि त्यांच्या वापरातील विविध वस्तू आकर्षण ठरत होत्या.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना 1902 ते 1905 या कालावधीत सावरकर या वसतिगृहात वास्तव्यास होते.