Swarget Katraj Underground Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा 

HomeBreaking Newsपुणे

Swarget Katraj Underground Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा 

कारभारी वृत्तसेवा Dec 23, 2023 10:27 AM

PMC Property Tax Lottery | मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण
ITI Training Center Yerawada |  MLA Sunil Tingre |  ITI Training Center to be set up at Yerawada
Iftar Party | सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक | अजित पवार | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

Swarget Katraj Underground Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा

 

Swarget Katraj Underground Metro | पुणे|स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे (Swarget Katraj Metro) काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे, या मार्गाला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यावर राज्य सरकारच्या हिश्श्यातील निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

मेट्रो मार्ग आणि अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत (Pune Nagar Road Traffic Congestion) आयोजित बैठकीत ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir MLA), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh), पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल (Rahul Mahiwal PMRDA), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण (Pune ZP CEO Ramesh Chavan), महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC), महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ (Atul Gadgil Mahametro)आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र शासन स्तरावर आवश्यक मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. या मेट्रो मार्गावरील स्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करावी. रामवाडी येथून विमानतळापर्यंत मेट्रो लाईन सुविधा देण्याचा विचार व्हावा.

अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती द्यावी. संगमवाडी ते खराडी रस्त्याचे भूसंपादन करण्याची कार्यवाही लवकर करावी. नगररोड परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. पोलीस विभागाने या भागात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, नगर रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची कार्यवाही तातडीने करावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करतांना स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे विचाराधीन आहे. लवकरच त्यास मान्यता मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळेल, यानंतर या मार्गावरील काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.