सुप्रिया सुळे यांना सलग सातव्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर
: खासदारांच्या उत्कृष्ट कामगिरीत सुप्रिया सुळे अव्वल
बारामती : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याही वर्षी जाहीर झाला आहे. खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार सुळे यांनी सलग सातव्या वर्षी पटकावला असून गेल्या वर्षी त्यांना याच संस्थेने त्यांना संसद महारत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फौंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. गेल्या बारा वर्षांपासून संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ मार्च रोजी दिल्ली येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, तर ८ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली.
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार सलग सातव्यांदा घोषित झाला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना केलेल्या संसदीय कार्याची दखल घेतली गेली,याचे समाधान आहे. pic.twitter.com/zE2HdvzYaI
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2022
COMMENTS