Sunil Shinde RMS | मेट्रो फेडरेशनच्या राष्ट्रीय सहसरचिटणीस पदी सुनील शिंदे यांची निवड
Metro Federation – (The Karbhari News Service) – ऑल इंडिया मेट्रो रेल एम्प्लॉईज फेडरेशनची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक दिल्ली येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये दिल्ली, जयपुर, लखनऊ बेंगलोर, कोलकाता, पुणे, नोएडा येथील मेट्रो मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांची राष्ट्रीय सह सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
या बैठकीमध्ये कामगार नेते सुनील शिंदे यांनी पुणे मेट्रो मध्ये काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न उपस्थित केले, त्याचबरोबर देश पातळीवर मेट्रोमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर सोडवण्यासाठीचा कृती कार्यक्रम यावेळी बैठकीमध्ये सादर केला.
COMMENTS