Sunil Shinde on Contract Employees | महापालिका अर्थसंकल्पात कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष | काँग्रेस चे स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांची टीका

HomeBreaking News

Sunil Shinde on Contract Employees | महापालिका अर्थसंकल्पात कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष | काँग्रेस चे स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांची टीका

Ganesh Kumar Mule Mar 25, 2026 8:04 PM

Maharashtra Budget 2025-26 | दिशाही नाही, दृष्टीही नाही – हा अर्थसंकल्प तरुणांच्या भविष्यावर अन्याय करणारा आहे! – प्रथमेश आबनावे
PMRDA Pune | पीएमआरडीएचे अधिकारी सोमवार, गुरुवारी नागरिकांना भेटणार | नागर‍िकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगर आयुक्त यांचा न‍िर्णय
PMC 75th Anniversary | पुणे आणि पिंपरी महापालिका यांच्यात रंगणार क्रिकेट सामना! | महापालिकेच्या वर्धापनदिना निमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Sunil Shinde on Contract Employees | महापालिका अर्थसंकल्पात कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष | काँग्रेस चे स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांची टीका

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापालिका कंत्राटी कामगारांना दुर्लक्षित करण्यात आले असून त्यांच्यासाठी कुठलीही ठोस तरतूद स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केली नाही. अशी टीका काँग्रेस चे स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांनी केली. (PMC Budget 2026-27)

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या महापालिका अंदाजपत्रकावर मुख्य सभेत चर्चा सुरू होती. त्यावेळी शिंदे यांनी कंत्राटी कामगारांकडे लक्ष वेधले.

शिंदे पुढे म्हणाले, कंत्राटी कामगार हा महापालिकेचाच कर्मचारी आहे. त्यासाठी तरतूद अपेक्षित होती. समिती अध्यक्षांना संधी होती या कामगारांना बजेट च्या माध्यमातून समान काम समान दाम देण्याची, मात्र समिती अध्यक्ष हे करू शकले नाहीत. कंत्राटी कामगारांच्या बोनस बाबत रक्कम देण्यात आली आहे. मात्र बक्षीशी अजूनही या कामगारांना दिली जात नाही. याबाबत समिती अध्यक्षांनी पुढाकार घेत यासाठी वर्गीकरणाने निधी उपलब्ध करून द्यायला हवा आहे. शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पात नवीन दवाखाने आणि जुन्या दवाखान्यांचे अद्ययावती करण करण्याबाबत भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र कुठलीही काळजी घेण्यात आली नाही.

सुनील शिंदे म्हणाले फेरीवाल्यांसाठी कायदा आहे मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. याबाबत फेरीवाला समितीची बैठक घेऊन यावर तोडगा काढायला हवा आहे. कामगार पुतळा चा सन्मान आपण करायला हवा आहे. बांधकाम कामगार साठी शेल्टर करावे. मोलकरीण भवन करावे. अशा विविध मागण्या शिंदे यांनी यावेळी केल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: