Sun city to warje Bridge | सनसिटी ते वारजे हा मुठा नदीवरील पूल मे अखेर चालू करण्याचे नियोजन | महापौर आणि प्रशासनाकडून पुलाच्या कामाची पाहणी 

Homeadministrative

Sun city to warje Bridge | सनसिटी ते वारजे हा मुठा नदीवरील पूल मे अखेर चालू करण्याचे नियोजन | महापौर आणि प्रशासनाकडून पुलाच्या कामाची पाहणी 

Ganesh Kumar Mule Feb 28, 2026 8:11 PM

Health Minister on GBS | ‘जीबीएस’ बाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काय दिले आदेश! | एका संशयित रुग्णाचा मृत्यू
PMC Recruitment | पुणे महापालिका पद भरती | अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ
PMC Pune | Health camp | पुणे महापालिकेच्या कॅन्सर तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद 

Sun city to warje Bridge | सनसिटी ते वारजे हा मुठा नदीवरील पूल मे अखेर चालू करण्याचे नियोजन | महापौर आणि प्रशासनाकडून पुलाच्या कामाची पाहणी

 

PMC Project Department – (The Karbhari News Service) – सनसिटी ते वारजे हा मुठा नदीवरील पूल मे अखेर चालू करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज या पुलाच्या कामाची महापौर आणि आयुक्त यांच्यासह महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली. अशी माहिती महापालिका प्रकल्प विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune PMC News)

सिंहगड रस्त्यावरील सनसिटी  ते वारजे येथील परिसर या पुलामुळे जोडला जाणार आहे. त्यामुळे राजाराम पूल व सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी  कमी होणेस मदत होणार आहे.

या पुलाच्या  कामाची एकूण किमत रकम 32 कोटी आहे.  पुलाची लांबी 275 मी असून 30 मी रुंदीचा पूल आहे. दोन्ही बाजूस 3 लेन चा रस्ता असून पुलावर 2 मी रुंदीचा पदपथ सहित 3 मी रुंदी मध्ये नागरिकांना काही ठिकाणी बैठक व्यवस्था असणार आहे.

 

Suncity To Warje Bridge – मुठा नदीवरील सनसिटी ते वारजे या पुलाचे संकल्पित छायाचित्र

 

आज  महापौर मंजुषा नागपुरे तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत या परिसरातील नगरसेवक, मनपा अधिकारी यांचे सहित जागा पाहणी करणेत आली. नागरिकांच्या अडचणी समजून घेवून उपाय योजना करणेत येणार आहेत.

या कामाची पाहणी करणेसाठी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर,  मुख्य अभियंता – प्रकल्प दिनकर गोजारे, राजेश बनकर ( मुख्य अभियंता- रोड) उपस्थित होते.

——-

हा  पूल पावसाळ्यापूर्वी ( मे 26 अखेर)चालू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. सनसिटी  व वारजे बाजूचे रस्त्यामधील अडथळे दूर व रस्ता रुंदीकरण करून नागरिकांसाठी सलग रस्ता उपलब्ध केला जाणार आहे.

| दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: