भुयारी मार्गामध्ये होणाऱ्या गैरप्रकारा विरोधात युवक राष्ट्रवादी चे कोथरूड पोलिस व महापालिकेस निवेदन
भुयारी मार्गात चालू असलेली गुन्हेगारी रोखून, साफ सफाई करून ते मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी लौकरात लौकर चालू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी केली. वेळेतच उपायोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील गिरीश गुरनानी यांनी प्रशासनाला दिला
पुण्यात बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता ओलाडण्याकरिता लाखो रुपये खर्चून भुयारी मार्ग बनवले आहेत. पण ज्या कारणासाठी हे मार्ग बनवले आहेत त्या व्यतिरिक्त इतरच गोष्टींसाठी ते वापरले जात आहेत समाज कंटक अश्या भुयारी मार्गांचा वापर स्वतःचे “अड्डे” म्हणून करत आहेत असेच चित्र अनेक ठिकाणी दिसते. काही भुयारी मार्गांना सार्वजनिक मुतारी चे स्वरूप आलेले आहे तर काही ठिकाणी पत्त्यांचे डाव रचले जातात तर काही ठिकाणी काही लोक खुशाल दारू पीत बसतात.महापालिकेने नेमलेले सुरक्षा रक्षक कधीच भुयारी मार्गाच्या प्रवेशाला उपस्थित नसतात.
अश्या मार्गांचा वापर वास्तविक स्त्रिया, गरोधर महिला व अबालवृद्ध नागरिक सुरक्षित रित्या रस्ता ओलांडण्यासाठी करू शकतात. पण तिथे चालत असलेल्या गचाळ कारभारामुळे नागरिक जाण्याचे टाळतात.
या सर्व प्रकारा विरुद्ध राष्ट्रवादी युवक कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड पोलिस ठाणे येथे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांना व पुणे महानगरपालिकेत मुख्य अभियंता श्रीनिवास बोलाना यांना निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भुयारी मार्गात चालू असलेली गुन्हेगारी रोखून, साफ सफाई करून ते मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी लौकरात लौकर चालू करावे अशी विनंती गिरीश गुरूनानी यांनी केली. या वेळी वेळेतच उपायोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील गिरीश गुरनानी यांनी प्रशासनाला दिला .या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे संकेत शिंदे ,ऋषिंकेश शिंदे आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.