State Level Sena Kesari Wrestling Pune  | पुण्यात रंगणार राज्यस्तरीय सेना केसरी कुस्त्यांचा फड : 5 लाखांपर्यंतची बक्षिसे!

HomeपुणेBreaking News

State Level Sena Kesari Wrestling Pune | पुण्यात रंगणार राज्यस्तरीय सेना केसरी कुस्त्यांचा फड : 5 लाखांपर्यंतची बक्षिसे!

गणेश मुळे Jan 19, 2024 8:24 AM

Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti |सदाशिव पेठेतील रहाळकर राममंदिरात पुणे काँग्रेस कार्यकर्ते करणार महाआरती
Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ टर्मिनल खुले होणार | काँग्रेसच्या लढ्याला यश
Mahayuti Melava Pune | माझ्या नावातच राम;  इतके वर्ष वनवासात होतो; आता मोदींमुळे व्यवस्थित बाहेर आलो | रामराजे नाईक निंबाळकर

State Level Sena Kesari Wrestling Pune  | पुण्यात रंगणार राज्यस्तरीय सेना केसरी कुस्त्यांचा फड : 5 लाखांपर्यंतची बक्षिसे!

| पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची संकल्पना

 

State Level Sena Kesari Wrestling Pune महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde)!यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पुण्यात भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे (State Level Sena Kesari Wrestling Pune) सामने आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी 1 लाखांपासून ते 5 लाखापर्यंत बक्षिस असणार आहेत. चार दिवसीय असलेल्या या सामन्यात, राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी होणार असून, मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी व रांगड्या मातीतील खेळाला चालना देण्यासाठी हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. राज्यभरातून कुस्तीप्रेमी व अनेक मातब्बर मल्ल या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Shivsena Pune) यांनी दिली. (State Level Sena Kesari Wrestling 2024 Pune)

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून, आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, जे. एस. पी. एम. कॉलेज शेजारी, हांडेवाडी येथे पार पडणार आहे.

भानगिरे यांनी सांगितले कि, विशेष म्हणजे विजयी मल्लांसाठी रोख रकमेसह ठेवण्यात आलेली बक्षीसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम ५ लक्ष रुपये व चांदीची गदा मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकास ३ लक्ष व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकास २ लक्ष व सन्मान चिन्ह व चतुर्थ क्रमांकास १ लक्ष व सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची भव्य बक्षिसे प्रधान केली जाणार आहेत. याचसोबत विविध वजनी गटातील मल्लांसाठी नानाविध बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे.

दरम्यान, भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने व परिषदेच्या नियमानुसार होणार असून, या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे. राज्यभरातील कुस्ती प्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे मोठी पर्वणी असणार आहे. असे ही भानगिरे म्हणाले.