State Election Commission | राज्य निवडणूक आयोगा कडू महापालिका क्षेत्रात लागू आदर्श आचारसंहिता संपुष्टात! 

Homeadministrative

State Election Commission | राज्य निवडणूक आयोगा कडू महापालिका क्षेत्रात लागू आदर्श आचारसंहिता संपुष्टात! 

Ganesh Kumar Mule Jan 20, 2026 1:05 PM

cVIGIL App | आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कराव्या लागल्या! | सी-व्हिजिल ॲप वर तक्रारी करण्याबाबत पुणेकरांची उदासीनता
Code Of Conduct | आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत
PMC Election Code of Conduct | पुणे महापालिका आयुक्तांकडून आचारसंहिते बाबत आदेश जारी 

State Election Commission | राज्य निवडणूक आयोगा कडू महापालिका क्षेत्रात लागू आदर्श आचारसंहिता संपुष्टात!

 

Code of Conduct – (The Karbhari News Service) – महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील २९ महापालिका मध्ये निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली होती. आता निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहिता उठवण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगा कडून जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता महापालिकांना विविध निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Maharashtra News)

 

राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या (बृहन्मुंबई महानगरपालिकासहीत) सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात  आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती.

दरम्यान १६ जानेवारी रोजी  रोजी सर्व महानगरपालिकांच्या (बृहन्मुंबई महानगरपालिकासहीत) सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या  मतदानाची मतमोजणी व निकाल घोषित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याचा अहवाल सर्व महानगरपालिका आयुक्तांकडून (बृहन्मुंबई महानगरपालिकासहीत) प्राप्त झालेला आहे.

त्यानुसार  संबंधित २९ महानगरपालिकांच्या क्षेत्रांपुरती (बृहन्मुंबई महानगरपालिकासहीत)  लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आणण्यात येत आहे. असे राज्य निवडणूक आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: