cVIGIL App | आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कराव्या लागल्या!   | सी-व्हिजिल ॲप वर तक्रारी करण्याबाबत पुणेकरांची उदासीनता

HomeUncategorized

cVIGIL App | आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कराव्या लागल्या! | सी-व्हिजिल ॲप वर तक्रारी करण्याबाबत पुणेकरांची उदासीनता

Ganesh Kumar Mule Feb 25, 2023 3:43 PM

Devendra Fadnavis | कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Kasba by-election | कसब्याच्या पराभवाचे मूल्यमापन; योग्य ती कारवाई करू | देवेंद्र फडणवीस
Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे | कारवाईचे दिले आश्वासन

आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कराव्या लागल्या!

| सी-व्हिजिल ॲप वर तक्रारी करण्याबाबत पुणेकरांची उदासीनता

पुणे| निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र कसबा पोटनिवडणूक प्रक्रियेत तक्रारी करण्याबाबत पुणेकरांची उदासीनताच दिसून आली. त्यामुळे सुरुवातीला लोकांमध्ये याबाबतची जाणीव जागृती व्हावी म्हणून आचारसंहिता कक्षातील कमर्चाऱ्यांनाच ऍप वर तक्रारी अपलोड कराव्या लागल्या.

जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील, यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.

ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.

तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगा बाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात.

तक्रारी करण्याबाबत आणि प्रशासनाला सुनावण्याबाबत पुणेकर नेहमी आघाडीवर असतात. त्यामुळे निवडणूक आयोगाला अपेक्षित होते कि पुणेकरांकडून तक्रारीचा पाऊस पडेल. मात्र आचारसंहिता उल्लंघनच्या तक्रारी करण्याबाबत पुणेकर उदासीन दिसून आले. त्यामुळे मग सुरुवातीला लोकांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी आचारसंहिता कक्षातील कर्मचाऱ्यांनाच या तक्रारी ऍप वर अपलोड कराव्या लागल्या. त्यानंतर हळूहळू तक्रारी येऊ लागल्या. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आतापर्यंत चिंचवड मध्ये फक्त 9 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर कसबा पेठ मधून  185 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.