Symbiosis Center for Distance Learning | कर्मचारी कौशल्य वाढीसाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडची सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगबरोबर भागीदारी

HomeBreaking Newsपुणे

Symbiosis Center for Distance Learning | कर्मचारी कौशल्य वाढीसाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडची सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगबरोबर भागीदारी

Ganesh Kumar Mule Nov 04, 2022 5:54 AM

Pune District : जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स आज पासून खुली
Why 26 January Is Celebrated as Republic Day Hindi Summary |  26 जनवरी को गणतंत्र दिवस के रूप में क्यों मनाया जाता है?  |  जानें इतिहास और महत्व!
Kasba Peth Constituency | कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त

कर्मचारी कौशल्य वाढीसाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडची सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगबरोबर भागीदारी

• कर्मचाऱ्यांच्या कौशल्य वाढीसाठी व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगसोबत सामंजस्य करार.
• या भागीदारी अंतर्गत कर्मचाऱ्यांना  दोन  वर्षांची व्यवसायिक प्रशिक्षणाची  पदव्युत्तर पदविका देण्यात येईल
पुणे : भारतातील आघाडीच्या मालमत्ता वित्तपुरवठा कंपन्यांपैकी एक असलेल्या श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड (एस टी एफ सी) ने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकास प्राप्तीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणीय  सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या ( SOES )  सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगसोबत (SCDL ) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या भागीदारी अंतर्गत एससीडीएल (SCDL ) तर्फे तरुण प्रतिभावान कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सच्या उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे. ह्या उपक्रमातील अभ्यासक्रम हा  स्वयं अध्ययनावर आधारित असून प्रशिक्षणार्थी कर्मचारी कोणत्याही वेळात ,कधीही, कोणत्याही उपकरणांवर तसेच क्लाउड आधारित तंत्रज्ञानावर या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊ शकतात.
ह्या उपक्रमाच्या प्रशिक्षणाचा कालावधी  हा  दोन  वर्षांचा असून या अभ्यासक्रमात  चार सत्रांचा समावेश असणार आहे. तसेच या अभ्यासक्रमात आर्थिक व्यवस्थापन आणि विपणन व्यवस्थापनाचा विशेष अभ्यासक्रम असणार आहे . या कराराअंतर्गत एससीडीएल (SCDL )  तर्फे एसटीएफसीच्या पात्र कर्मचाऱ्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ( एआयसीटीई  ) मान्यतापात्र  व्यावसायिक प्रशिक्षणातील  पदव्युत्तर पदविका  अभ्यासक्रमाचे  प्रशिक्षण देण्यात येईल. विशेष बाब म्हणजे या उपक्रमासाठी  एससीडीएल  आणि  एसटीएफसी  ने  प्रक्रिया आणि उत्पादनांशी संबंधित  नॉन बँकिंग वित्तीय संस्थांच्या  कार्यक्षेत्र अभ्यासक्रमांसाठी संयुक्त प्रमाणीकरणावर सहमती दर्शवली आहे, ज्यामुळे व्यवस्थापन शिक्षण योजनेच्या अंतर्गत या उपक्रमाला  प्रतिष्ठित संस्था मान्यता मिळाली आहे. हा अभ्यासक्रम कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण  क्षेत्राला  परिपूर्ण करण्यास मदत करेल.  ह्या उपक्रमाचा अभ्यासक्रम हा व्यवस्थापनशास्त्राच्या संपूर्ण बाबींचा  आढावा घेत तयार करण्यात आलेला  आहे.
या सामंजस्य कराराबद्दल बोलताना एसओईएसच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग ( (SCDL )) व्यावसायिक कार्यकारी प्रशिक्षणामध्ये नेहमीच अग्रस्थानी  असून भारतातील तसेच  परदेशातील  व्यावसायिकांसाठी  एक अग्रणीय  शैक्षणिक भागीदारीसाठीचे केंद्रबिंदू  आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सच्या सहकार्याने आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांची  प्रतिभा क्षमता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत. मला खात्री आहे की ही भागीदारी दोन्ही संस्थांसाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून देतील.
या सामंजस्य कराराबद्दल बोलताना श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचे उपसंचालक आणि मनुष्य पाठबळ संसाधनांचे मुख्य श्री. एस. सुंदर म्हणाले की श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड नेहमीच  कर्मचाऱ्यांच्या  शिक्षणावर लक्ष केंद्रित करत असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून  देण्यास  प्रयन्तशील असते  .श्रीराम व्यवस्थापन शिक्षणाच्या  योजनेअंतर्गत विविध व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी  ३४०० कर्मचारी आमच्याकडे नोंदणीकृत आहेत. सिंबायोसिस सोबतच्या या सामंजस्य कराराद्वारे श्रीराम कुटुंबाचा पाया अधिक भक्कम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.