Srinath Bhimale | मी लढणारा कार्यकर्ता | नाराज श्रीनाथ भिमाले दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार!
Shrinath Bhimale – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. वरिष्ठ स्तरावरून तिकीट दिले जाईल अशी भिमाले यांना आशा होती. मात्र आमदार माधुरी मिसाळ यांना तिकीट मिळाल्याने भिमाले नाराज आहेत. तसेच निवडणूक लढण्याबाबत येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले आहे. (Parvati Vidhansabha)
पर्वती विधानसभा मतदार संघातून भिमाले यांनी दंड थोपटले होते. परंतु आज विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पक्षाने चौथ्या वेळी देखील पक्षाच्या वतीने उमेदवारी देऊन लढण्याची संधी दिली आणि भिमालेना संधी नाकारली .यामुळे ,रिक्षावाले, मोल मजुरी करणारे , मध्यमवर्गीय तसेच व्यापारी अशा विविध स्तरावर मतदार संघात पूर्णतः पोहोचलेले भिमाले आता काय करणार ? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांनी मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे असे सांगून … कार्यकर्ते आणि नागरिक यांच्याशी बोलून निर्णय घेण्यासाठी २ दिवसांचा अवधी राखून ठेवला आहे. त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. भिमाले अपक्ष देखील लढू शकतात. असे बोलले जात आहे.
COMMENTS