वीज खरेदी बाबत SPV केली जाणार स्थापन
: पुणे महापालिका प्रशासनचा निर्णय
त्यापोटी अदा करण्यात आलेल्या रक्कमेची माहिती सोबत देण्यात आलेली आहे. या यादीनुसार विद्युत विभागास सर्व पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र व उपसा केंद्रासाठी जवळपास 23 MW इतकी विजेची मागणी असून दर महीना अंदाजे 1,28,55,450 kwh युनिटचे म्हणजे
15,42,65,400 kwh युनिटचे दर वर्षी वापर होत आहे. यासाठी ओपन ॲक्सेसच्या द्वारे वीज खरेदी करावयाचे झाल्यास MERC च्या नॉर्मनुसार 1 MW पेक्षा जास्त वीज वापर असलेल्या ठिकाणी ओपन ॲक्सेसमधून वीज खरेदी करता येणे शक्य असून त्याद्वारे वीज खरेदी केल्यास महावितरणकडून मिळत असलेल्या सध्याच्या वीज दरापेक्षा किमान 1.83 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक ( प्रति युनिट ) बचत करणाऱ्या दरामध्ये बीज खरेदी होवून प्रति महीना वीज वापरापोटी होणाऱ्या खर्चात अंदाजे रक्कम रु.2.35 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम प्रति महीना बचत करणे शक्य होईल म्हणजेच वार्षिक र.रु.28.23 कोटी पेक्षा जास्त रक्कम बचत होऊ शकेल.
समभाग खर्च पुणे मनपाने करावा लागणार आहे व 74% मे. महाप्रीत ( MAHAPREIT ) कडुन समभाग खर्च राहील,
3) प्रस्तावित सौर उर्जा प्रकल्पाची एकुण प्रकल्पीय किंमत अंदाजे र. रू 200 कोटी (अंदाजे 50 MW क्षमतेच्या प्रकल्पासाठी) आहे. त्याप्रमाणे अंदाजे र.रू 10.40 कोटी इतकी रक्कम समभाग भांडवल म्हणुन मनपास द्यावी लागेल. (200×20%x 26% ) सदर समभाग भांडवल रीफन्डेबल असून मा. SPV च्या फायदा मधील लाभांश पुणे मनपास याप्रमाणे मिळेल.
4) या SPV कंपनीमार्फत उपलब्ध मोकळ्या जमिनीवर 50 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांची अंमलबजावणीकरतील. मोकळया जमिनीची उपलब्धता मे. महाप्रीत ( MAHAPREIT ) मार्फत करण्यात येणार आहे.
Special Purpose Vehicle (SPV) अंतर्गत कम्पलीट डिजाइन, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग करणे इत्यादी या बाबींचा समावेश आहे. सदरील सौर प्रकल्पाचे 20 वर्षासाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीचा समावेश आहे.
उपकर्णांचे डिझाइन, अभियांत्रिकी, मॅन्युफॅक्चर, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यप्रदर्शन नवीनतम IEC/ भारतीय मानकांनुसार असेल. जेथे योग्य भारतीय मानके आणि कोड उपलब्ध नाहीत, अशा वेळेस
आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजूर केलेले योग्य मानक कोड वापरण्यात येतील.
6) SPV पूर्णपणे प्रकल्पामध्ये गुंतवणूक करेल आणि तेथील प्रकल्पाची पूर्ण मालकी ही SPV ची असेल आणि PMC, SPV मध्ये 26% इक्विटी PMC आणेल.
7) सध्याच्या ग्रिड दरांपेक्षा कमी दराने PPA मध्ये 20 वर्षासाठी स्वाक्षरी केली जाईल. सदरचा दर रक्कम रु. 3.40 प्रती युनिट प्रमाणे 20 वर्षापर्यंत खरेदी करावे लागणार असून 20 वर्षापुढील 5 वर्षापर्यंत निशुल्क वीज पुणे मनपास मिळेल.
8) एसपीव्ही, संबंधित प्राधिकरण आणि विभागांकडून सर्व पूर्व आवश्यक मान्यता मिळवण्यास सहाय्य करेल आणि प्रकल्पाची स्थापना, कमिशनिंग, दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी मान्यता/परवानग्यासाठी सर्व
सहयोगी खर्च उचलेल.
पुणे महानगरपालिकेकडे ओपन अॅक्सेसद्वारे पॉवर खरेदी करून एनर्जी सेव्हिंग करणे या प्रकल्प राबविल्यानेखालील फायदे होणार आहेत.
हा वेगळा व्हीलिंग शुल्क आहे. मे. महाप्रीत ( MAHAPREIT) विजेच्या किंमतीपेक्षा खूप कमी दर प्रदान
करेल जे र.रु. 3.40/kwh + लागू व्हीलिंग / OA + transmission शुल्काच्या जवळपास उत्पादन खर्च
आहे.
2) प्रस्तावित प्रकल्पानुसार, पंपिंग स्टेशनसाठी विश्वासार्ह वीज पुरवण्यासाठी ग्राउंड माउंट सौर प्रकल्पांची
उभारणी SPV कंपनीकडून केली जाईल. म.रा.वि.वि.कं.लि. च्या लाईट बिलातील ओपन अॅक्सेसद्वारे
करण्यात येणारे बीज खरेदीचे युनिटनुसार बिल, SPV कंपनीस अदा केल्याने वीज खरेदीतील युनिटच्या परीमाणाबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही.
हया कामासाठी SPV स्थापन करण्यात येणाऱ्या SPV मध्ये पुणे महानगरपालिकेकडून खालील सदस्य प्रस्तावित करण्यात येतील.
महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका
अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट)
मुख्य अभियंता (विद्युत), पुणे महानगरपालिका
एनर्जी सेव्हिंग या क्षेत्रातील तज्ञ.
महाप्रीत (MAHAPREIT) चे प्रतिनिधी,
अशाच प्रकारे यापूर्वी ओपन अॅक्सेसद्वारे पॉवर खरेदी करून एनर्जी सेविंग करणे हा प्रकल्प मे EESL या शासकीय संस्थे मार्फत राबविण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. मे. EESL यांच्याकडून वीज खरेदी करण्यासाठी पॉवर
पर्चेस एग्रीमेंट करण्यास व रक्कम रुपये 3.40 पैसे प्रति युनिट या दराने बीज खरेदी करण्यास आणि त्यांच्याशी एस पी व्ही (SPV ) कंपनी स्थापन करण्यास दि. 28/12/2021 रोजीचे ठराव के 1809 अन्वये मा.स्थायी समितीची मान्यता मिळाली असून मा. मुख्य सभा यांच्याकडे सदर मान्यतेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे मे. EESL यांच्याशी पावर पस
एग्रीमेंट केले नाही. EESL या शासकीय संस्थेकडे सोलर एनर्जी उपलब्ध नसून यासाठी जागा निश्चित करणे व जागा खरेदी करणे आणि तदनंतर सोलर प्लांटची उभारणी करणे इत्यादी कामे करावयाची असल्याने त्यांचेकडून वेळेत बीज खरेदी करणे अडचणीचे दिसून येते. म्हणून EESL या संस्थेकडून वीज खरेदी करण्याऐवजी मे महाप्रित या शासकीय संस्थेकडून वीज खरेदी करणे सोयीस्कर होईल कारण मे महाप्रीत यांच्याकडे सोलर एनर्जी प्लांट उपलब्ध असल्याकारणाने पुणे मनपास वेळेत मे. महाप्रितकडून बीज मिळू शकेल म्हणून मे महाप्रित या शासकीय संस्थेकडून सदर वीज खरेदीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.
COMMENTS