Dipali Dhumal : मनपा हद्दीतील खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान करावा :महापालिका विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी 

HomeपुणेPMC

Dipali Dhumal : मनपा हद्दीतील खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान करावा :महापालिका विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी 

Ganesh Kumar Mule Oct 30, 2021 6:03 AM

Ajit Pawar Vs Chandrakant Patil | पुण्यात पाटील विरुद्ध पवार चुरस पाहायला मिळणार 
Big Breaking News : मोठी बातमी : गणेश  बिडकर  यांचे  सभागृह  नेते  पद  रद्द!
culvert construction | कल्व्हर्ट बांधकाम / दुरुस्तीच्या कामांचा अतिरिक्त आयुक्तांनी मागवला अहवाल  | 7 जुलै पूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश 

 मनपा हद्दीतील खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान करावा

महापालिका विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

 क्रिडा धोरणातील अटी शिथील करा

पुणे : पुणे मनपा ही पुण्यातील गुणवत खेळाडूंचा सत्कार व क्रीडा शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान दरवर्षी करतअसते. परंतु पुणे मनपाने सन २०२०-२१ चे क्रीडा शिष्यवृत्ती वाटप केले नाही. वास्तविक प्रशासनाने या विषयी जाहिरात देऊन खेळाडूंकडून अर्ज मागविले नाहीत. त्यामुळे मनपा हद्दीतील खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी महापालिका विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. शिवाय क्रीडा धोरणातील अट शिथिल करण्याची मागणी देखील धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना  केली आहे.

: खेळाडुवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धुमाळ यांच्या पत्रानुसार मार्च  २०२० नंतर कोरोनाचे संकट आल्यानंतर पुढचे काही महिने म्हणजे साधारणपणे डिसेंबर २०२० पर्यंत बऱ्याच ठिकाणी स्पर्धा झाल्या नाहीत. परंतु देशविदेशात जानेवारी२०२१ पासून बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालू झाल्या आहेत. खेळाडु कोरोनाचे संकट असतानादेखील कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाय व नियम या अनुषंगाने विविध स्पर्धेत भाग घेत आहेत. तसेच अनेक खेळाडु राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये संबंधीत क्रिडा असोसिएशन नियमानुसार त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या खेळातील कामगिरीनुसार मिळालेल्या मानांकनानुसार निवड श्रेणीमधुन सहभागी होत असतात. अशा खेळाडुंना निवड पत्राची आवश्यकता नसते परंतु मनपा क्रिडा धोरणात निवडपत्र असेल तरच शिष्यवृत्ती देणेबाबतचा नियम आहे. यामुळे अनेक खेळाडु या शिष्यवृत्तीपासुन वंचित राहतात, याबाबत पुणे मनपाने योग्य ती खबरदारी घेवून कोणत्याही खेळाडुवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पुणे मनपाकडुन सन २०२०-२१ व २१-२२ क्रीडा शिष्यवृत्ती देणे आवश्यक असुन खेळाडूंच्या पुर्वीच्या ३ वर्षांच्या काळात केलेल्या कामगिरीचा विचार करून देण्यात यावी. यामुळे फक्त ८ महिने स्पर्धा झाल्या नाहीत म्हणून क्रीडा शिष्यवृत्ती न संयुक्तिक होणार नाही. तरी सर्व खेळाडूंना शिष्यवृत्ती मिळनेसाठी क्रिडा धोरणातील निवडपत्राची अट शिथील करावी व पुणे मनपा हद्दीतील खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान दरवर्षी प्रमाने सन्मान करावा. असे ही धुमाळ म्हणाल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0