पिस्तूल शूटर ऋग्वेदा रघुनाथ डोळस हिची अहमदाबाद येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत निवड
पुणे : २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र एअर फायर आर्मस कंपेटेशन ऑगस्ट २०२१/22 ही राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पिंपळे गुरव येथील नेमबाज ऋग्वेदा रघुनाथ डोळस हिचा २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल इव्हेंट सिनियर वूमेन गटात २४७ गुण प्राप्त करुन द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
: राष्ट्रीय पातळीवर देखील दखल
ह्या कामगिरी बरोबरच हीची ऑक्टोबर महिन्यात अहमदाबाद मध्ये होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हया स्पर्धेत मुंबई येथील नेमबाज नमिता पाटिल यांना २६२ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
ऋग्वेदा डोळस या श्री शिछत्रपती स्पोर्ट्स कॉम्पॅक्स महळुंगे बालेवाडी स्टेडियम पुणे येथे आंतररा्ट्रीय नेमबाज सोनाली परेराव ह्यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत. त्याच्रमाणे ह्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर इवेन मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ऋग्वेदा रघुनाथ डोळस हिचे कुटुंब व मित्रपरिवर ह्यांच्याकडून मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन व आगामी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा.
COMMENTS