Siddheshwar Shinde Transfer | लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे यांची नागपूर विभागात बदली | राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून आदेश जारी
| गोरमाळे गावातील मित्र परिवाराने शुभेच्छा देत साजरा केला आनंद
Account Officer Siddheshwar Shinde – (The Karbhari News Service) – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे (Shri Tuljabhavani Mandir Sansthan)तत्कालीन लेखाधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे (Siddheshwar Shinde) यांची राज्य सरकार कडून छत्रपती संभाजीनगर महसुली विभागातून नागपूर महसुली विभागात बदली करण्यात आली आहे. शिंदे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम नुसार निलंबित (Suspend) करण्यात आले होते. मात्र सरकारच्या निलंबन आढावा समितीने शिंदे यांचे निलंबन रद्द (Suspension Revoked) केले आहे. तसेच त्यांना नागपूर विभागात पदस्थापना (Posting) देण्यात आली आहे. याबाबत गोरमाळे (Gormale) आणि आसपासच्या परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे. (Maharashtra News)
निलंबन केले रद्द
बार्शी तालुक्याच्या गोरमाळे गावचे मूळचे रहिवाशी असलेले शिंदे हे शांत आणि मितभाषी म्हणून ओळखले जातात. राज्यात बऱ्याच ठिकाणी लेखाधिकारी म्हणून काम केल्यानंतर सरकारने शिंदे यांना श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान ची जबाबदारी दिली होती. आपल्या करीयरच्या ऐन टप्प्यावर शिंदे यांच्यावर आरोप झाले होते त्यामुळे सरकारने शिंदे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम-४ च्या पोटनियम (२) (अ) मधील तरतूदीनुसार २२.०२.२०२४ च्या आदेशान्वये ०८.०२.२०२४ पासून निलंबित केले होते. त्या दरम्यान त्यांची चौकशी देखील केली जात होती.
दरम्यान राज्याच्या महसूल विभागाच्या प्रशासकिय विभाग स्तरावर गठीत केलेल्या निलंबन आढावा समितीसमोर निलंबीत अधिकारी शिंदे यांच्या निलंबनाचा आढावा ६ मार्च रोजी घेण्यात आला. निलंबन आढाव्यात शिंदे यांचे निलंबन रद्द करुन शासन सेवेत पुनःस्थापित करण्याची शिफारस विभागाच्या निलंबन आढावा समितीने केली. त्यानुसार त्यांचा मूळ महसूली विभाग व ते निलंबनापूर्वी ज्या महसूली विभागात कार्यरत होते तो महसूली विभाग वगळून अन्यत्र अकार्यकारी पदावर त्यांची पुनःस्थापना करण्याची शिफारस निलंबन आढावा समितीने केली. ही शिफारस विचारात घेऊन सिध्देश्वर मधुकर शिंदे यांना न्यायालयीन निर्णयाच्या व विभागीय चौकशीच्या निर्णयाच्या अधीन राहून निलंबनातून मुक्त करुन शासन सेवेत पुनःस्थापित करण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे.
लेखाधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे यांना सुदुर संवेदन उपाययोजन केंद्र, व्हि. एन. आय.टी. परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यात्रेत पेढे वाटत साजरा केला आनंद
दरम्यान लेखाधिकारी शिंदे यांच्या या बदलीने आणि त्यांचे निलंबन रद्द केल्याने गोरमाळे गावातून खासकरून त्यांच्या मित्र परिवारातून आनंद व्यक्त केला जात आहे. गावात श्री सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा सुरु आहे. याचे निमित्त साधून मित्र परिवाराने पेढे वाटत आपला आनंद साजरा केला आणि शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी शिंदे यांचे सहकारी बालाजी वराळे, सुदर्शन माने, लक्ष्मण मोरे, सुदर्शन शिंदे, राम शिंदे, विश्वनाथ गुरसूळकर, निलेश गपाट तसेच यात्रेसाठी आलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावात शेकडो वर्षाची खंडित झालेली प्रथा सुरु करण्यात केले होते विशेष प्रयत्न
शेकडो वर्षांपूर्वी तुळजाभवानी मातेच्या पालखीचे आणि पलंगाचे गोरमाळे गावात आगमन होत होते. मात्र ती प्रथा कालांतराने बंद झाली. याचे नेमके कारण कोणी सांगू शकत नाही. मात्र गोरमाळ्याचा तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघनाचा मान कायम आहे. त्यामुळे ही प्रथा पुन्हा चालू करण्याबाबत श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान लेखाधिकारी असताना शिंदे यांनी प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यानुसार ही कल्पना त्यांनी सचिन भगत यांना सांगितली होती. भगत यांनी देखील तात्काळ विनंतीला मान दिला आणि पालखी आणि पलंग गावात आणण्याचे निश्चित झाले. त्यानुसार गेल्या तीन वर्षापासून आता गावात पालखी येत आहे आणि गावातील आणि परिसरातील भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत आहे. शिंदे यांच्या या प्रयत्नाचे गावातून खूप कौतुक झाले होते.
COMMENTS