SI, DSI Transfer | आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या बदल्या!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका प्रशासनाकडून आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ४ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तर ५३ आरोग्य निरीक्षक यांचा समावेश आहे. महापालिका प्रशासन कडून समुपदेशन करून या बदल्या करण्यात आल्या आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यामध्ये राम सोनावणे, गणेश खिरीड, संदीप चव्हाण आणि सुनिल तंवर यांचा समावेश आहे. अशी चर्चा आहे की यातील काही वरिष्ठ आरोग्य निरीक्षक कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करत होते. मात्र अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी आता बदल्या केल्या आहेत. आरोग्य निरीक्षक मध्ये देखील असे कर्मचारी होते जे वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून होते. अशा लोकांवर आता चाप बसणार आहे. मात्र थोड्या दिवसात लगेच हे कर्मचारी आपल्या मूळ जागी परत येऊ नये यासाठी प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

COMMENTS