Shrinath Bhimale PMC | अधीक्षक अभियंत्यांच्या बदली प्रकरणाची सायबर क्राईमकडे तक्रार करा | स्थायी समितीचे निर्देश

Homeadministrative

Shrinath Bhimale PMC | अधीक्षक अभियंत्यांच्या बदली प्रकरणाची सायबर क्राईमकडे तक्रार करा | स्थायी समितीचे निर्देश

Ganesh Kumar Mule Jul 16, 2026 8:55 PM

PMC Employees Promotion | विभागीय परीक्षा नाही, पदवी नाही, टायपिंग नाही तरीही सेवाजेष्ठता यादीत वरचे स्थान!
PMC Employees Promotion | वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक पदाची पदोन्नती प्रक्रिया २ वर्षापासून प्रलंबित! | आचारसंहितेच्या आधी पदोन्नती देण्याची मागणी
PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव

Shrinath Bhimale PMC | अधीक्षक अभियंत्यांच्या बदली प्रकरणाची सायबर क्राईमकडे तक्रार करा | स्थायी समितीचे निर्देश

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – महापालिकेतील अधीक्षक अभियंत्यांच्या बदली प्रकरणात माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची सायबर क्राईम कडे तक्रार करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले. (PMC Employees Promotion)

भिमाले म्हणाले, “बदली रद्द करण्यासाठी थेट आयुक्तांना व्हॉट्सअॅप संदेश पाठविल्याच्या आरोपांचीही सखोल चौकशी करण्यात यावी. अधीक्षक अभियंत्यांच्या बदलीचे मूळ कारण काय होते, त्याची अधिकृत नोंद उपलब्ध आहे का, शासनाच्या बदली धोरणाचे आणि महापालिकेच्या नियमांचे पालन करण्यात आले का, तसेच भविष्यात अशा प्रकारचा कोणताही बाह्य हस्तक्षेप होणार नाही यासाठी कोणती यंत्रणा उभारण्यात येणार आहे, याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली.”

भिमाले म्हणाले, ” हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर असून, प्रशासनाची पारदर्शकता आणि विश्वास यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्यामुळे सायबर क्राईमच्या माध्यमातून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी अधिकारी अथवा संबंधित व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि नागरिकांचा विश्वास कायम राहावा यासाठी प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध करावे.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: