Shri Ram Lalla  Pran pratishta Holiday | श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारीला पुणे महापालिकेला सुट्टी! 

HomeBreaking Newsपुणे

Shri Ram Lalla  Pran pratishta Holiday | श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारीला पुणे महापालिकेला सुट्टी! 

गणेश मुळे Jan 19, 2024 3:12 PM

Water problem of Baner-Balewadi-Sus-Mhalunge | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!
Teacher Recruitment | PMC | अर्ज करण्यासाठी उद्याची शेवटची मुदत  | महापालिका इंग्रजी शाळेत नेमणार शिक्षक 
Shivsena Agitation Against Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे शहर शिवसेना प्रचंड आक्रमक | जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन

Shri Ram Lalla  Pran pratishta Holiday | श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारीला पुणे महापालिकेला सुट्टी!

Shri Ram Lalla  Pran Prathishta Holiday | आयोध्येमधील श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Ram Mandir Inauguration) दिनानिमित्त २२ जानेवारी रोजी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Ram Mandir Pran Pratistha Holiday)
राज्य सरकारने राज्यभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचाच आधार घेऊन महापालिका प्रशासनाने ही सुट्टी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळून महापालिकेच्या सर्व कार्यालयांना सोमवारी सुट्टी असणार आहे.
The karbhari - PMC Holiday
| पुण्यातून श्रीनाथ भिमाले यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती मागणी 
 आयोध्येमधील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Ram Mandir Inauguration) दिनानिमित्त २२ जानेवारी २०२४ हा दिवस राष्ट्रीय सण घोषित करून दरवर्षी सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करण्याची विनंती पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा भाजपचे पुणे लोकसभेचे समन्वयक श्रीनाथ यशवंत भिमाले (Shrinath Bhimale Pune)  यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली होती. याबाबत भिमाले यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते.
सार्वजनिक सुट्टी घोषित केल्याने नागरिकांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण होऊन सर्व नागरिक श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त साजरे केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक उत्सवात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे आमच्या विनंतीचा विचार करण्यात यावा, असे भिमाले यांनी पत्रात म्हटले होते.