Shivsena UBT | PMC Medical College | महापालिका मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाची चौकशी करून बरखास्त करा | शिवसेना (UBT) ची मागणी
Shivsena UBT | PMC Medical College | पुणे मनपा च्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा लाचखोर डी एन ला निलंबित करा आणि व्यवस्थापन मंडळाची चौकशी करून बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेने (UBT) महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Shivsena UBT | PMC Medical College)
शिवसेनेच्या निवेदनानुसार गरीब गरजू विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात कमी खर्चात शिक्षण घेता यावे. यासाठी खासगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी. याहेतूने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे चा .डी एन. आशिष बनगीनवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून त्याचे तत्परतेने निलंबन करावे तसेच त्याची तिथे अधिकारी पदावर नियुक्ती झाल्यापासूनची चौकशी करावी. आणि यातील सत्य कर भरणाऱ्या सामान्य पुणेकर नागरिकांना कळविण्यात यावे. तसेच व्यवस्थापन मंडळाची देखील चौकशी करणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षापासून व्यवस्थापन कोट्यामध्ये झालेल्या प्रवेशांची आर्थिक गुन्हे शाखे मार्फत चौकशीचे आदेश पारित करावेत. तसेच हा भ्रष्टाचार फक्त डिन पर्यंत मर्यादित नाही तर याची पाळेमुळे व्यवस्थापन मंडळापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे व्यवस्थापन मंडळ त्वरित बरखास्त करावे. सर्व अधिकार त्रयस्थ व्यक्तीकडे म्हणजे निवृत्त न्याधिशांकडे द्यावेत. सदर महाविद्यालयात प्रशासक नेमावा व्यवस्थापन कोटा असलेले निकष मागील तीन वर्षात योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली आहे की नाही. याची देखील खात्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. (PMC Medical College Dean)
पुढील प्रवेशांमध्ये व्यवस्थापन कोटा बंद करून मेरिट लिस्ट प्रमाणेच सर्व ऍडमिशन करण्याचे आदेश आयुक्तांनी जारी करावेत. तसेच सदर वैद्यकीय महाविद्यालयात 25 ऍडमिशन हे व्यवस्थापन कोट्यातून देण्यात येतात हा कोटा कसला आहे ? म्हणजे व्यवस्थापन कोटा हा भ्रष्टाचाराचा मार्ग आहे का ? हा प्रश्न आम्हास आहे आणि सदर अधिकारी हा फक्त मोहरा असून यात अजून कोणाकोणाचा सहभाग आहे याची चौकशी करण्यात यावी. सदर विषय शिवसेनेने गांभीर्याने घेतला असून या विषयाला योग्य न्याय मिळण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत . अशी मागणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने नवेदनात करण्यात आली. (Pune Municipal Corporation News)
यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहरसंघटिका पल्लवीताई जावळे, निकिता मारटकर, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, विश्वास चव्हाण, अनंत घरत, संजय सकपाळ, नागेश खडके, किशोर रजपूत, अरविंद दाभोळकर, नितीन दलभंजन, मुकुंद चव्हाण, भरत गोगावले, रूपेश पवार, अजय परदेशी, संजय वाल्हेकर, योगेश पवार, चंदन साळुंके, पंढरीनाथ खोपडे, राजू पवार, झुबेर तांबोळी, अविनाश सरोदे, अजिंक्य पांगरे उपस्थित होते. (Shivsena UBT Pune)
—–
News Title | Shivsena UBT | PMC Medical College | Investigate and dismiss the Board of Management of the Municipal Medical College Shiv Sena (UBT) demand