Shivsena Pune (UBT) –  शहरात उदभवलेल्या साथीच्या आजारा बाबत उपाययोजना करा | शिवसेना ठाकरे गटाची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

HomeBreaking News

Shivsena Pune (UBT) –  शहरात उदभवलेल्या साथीच्या आजारा बाबत उपाययोजना करा | शिवसेना ठाकरे गटाची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Aug 26, 2024 9:51 PM

Prevent the emergence of mosquitoes, the PMC will spray insecticides through drones!
PMC Medical College | पुणे महापालिकेचे मेडिकल कॉलेज अडचणीत! | १ कोटी रुपयाच्या दंडाची नोटीस? 
PMC CHS Health Scheme | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या औषध बिलांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली

Shivsena Pune (UBT) –  शहरात उदभवलेल्या साथीच्या आजारा बाबत उपाययोजना करा | शिवसेना ठाकरे गटाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

 

Pune Health News – (The Karbhari News Service) – शहरात उदभवलेल्या साथीच्या आजारा बाबत उपाययोजना करा, या मागणीसाठी  शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. (Pune News)

याबाबत विशाल धनवडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार आज शहरातील प्रत्येक भागात प्रत्येक घरात एक तरी डेंगू, चिकनगुनीया, मंकी फाक्स, झिका आणि ईतर असे अनेक आजारांचा रुग्ण आढळत आहेत. यावर प्रशासन मार्फत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने शहरातील नागरिका कोणी वाली नसल्याची भावना मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

एखादा रुग्ण अॅडमिट झाल्यास त्याला 25,000 ते 1,00,000 रुपये बिल येत आहे. तरुण मुले दगावत आहेत. म्हणुन  आयुक्तांना विनंती आहे की
त्यांनी आरोग्य विभागाची तसेच शहरातील हॉस्पिटल व्यवस्थापक डॉक्टर यांची बैठक लावून योग्य ती कारवाई सुरू करावी व शहरात औषध फवारणी करून
नागरिकांमध्ये साथीच्या आजारांमुळे जे भीतीचे वातावरण तयार झाले आहे ते दूर करावे.

पुढील आठ दिवसात उपय योजना करावी अन्यथा शिवसेना पुणे शहर याबाबतीत मोठे जन आंदेलन उभारेल. असा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, बाळा ओसवाल, वसंत मोरे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0