Shivsena Pune | शिवसेनेकडून पुण्यातील पाण्याखालील परिसरातील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

HomeBreaking Newsपुणे

Shivsena Pune | शिवसेनेकडून पुण्यातील पाण्याखालील परिसरातील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

गणेश मुळे Jul 26, 2024 4:27 PM

Jejuri | Supriya Sule | जेजुरी स्थानक अद्ययावत करा | खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र
Prashant Jagtap | NCP Pune | मुख्यमंत्र्यांनी निष्क्रिय आरोग्यमंत्र्यांचा व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा | प्रशांत जगताप
Pune Metro News | वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता!

Shivsena Pune | शिवसेनेकडून पुण्यातील पाण्याखालील परिसरातील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

 

Pune News – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या आदेशान्वये पुणे शहरातील सिंहगड रोडवरील एकता नगरी,निंबजनगर, विठ्ठल नगर, जलपूजन अपार्टमेंट तसेच पुलाची वाडी, पाटील इस्टेट विश्रांतवाडी,वारजे,दत्तवाडी, दांडेकर पूल,कोरेगाव पार्क, बोपोडी,येरवडा या परिसरात साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यासाठी युद्ध पातळीवर मोहिम राबविण्यात आली असून 200 स्वयंसेवकांच्या टीम कडून पाण्याखालील परिसरातील गाळ उपसून काढण्यात सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना पुणे शहराचे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे स्वतः घटनास्थळी पोहोचत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार, ‘शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे’ यांनी आवश्यक ती पाऊले उचलत, पुणे शहरातील सिंहगड रोड, संचेती पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलाचीवाडी आदी भागात मनपाच्या सफाई कामगारांना सोबत घेवून, आपण स्वत: तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खासगी कंपनीच्या मदतीने अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने परिसरातील चिखल उपसायला सुरवात केली आहे व आवश्यक ती मदत देखील तेथील नागरिकांना पुरवण्यात येत आहे.
पुणेकरांना मदत करण्याससाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून स्वतंत्र मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. पुणे शिवसेनेमार्फत शिवाजीनगर परिसरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी शिवाजीनगर मतदारसंघातील पी. एम. सी. कॉलनी वाकडेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, वाकडेवाडीतील न. ता. वाडी शाळा, शिवाजीनगर मेट्रो स्टेशनमागील खाशाबा जाधव शाळा, आणि संगमवाडी येथील मेजर राणे शाळा या ठिकाणी भोजनाची सोय करण्यात आलेली आहे.

शिवसेनेमार्फत अतिमुसळधार पावसामुळे व पुरामुळे शहरातील विविध ठिकाणी नागरिक अडकले असता त्यांना तातडीने सुरक्षितरित्या हलविण्यात आले व यावेळी नागरिकांना झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय मदत पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने पुरवण्यात आली आहे. तसेच पुरानंतर उद्भवू शकणाऱ्या संभाव्य साथ रोगाच्या शक्यतेमुळे नागरिकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाकडून देण्यात येणार आहे. तसेच
पुरामुळे नागरिकांचे झालेले नुकसान विचारात घेवून, शिवसेना पुणेतर्फे संसारोपयोगी साहित्याची मदत करण्यात येणार आहे.
पुरामुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्त नागरिकांना स्वत:च्या घराची स्वच्छता करण्यासाठी मदत करण्यासह परिसरातील चिखल काढून परीसराची स्वच्छता करण्यासाठी, शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे, रमेश बापू कोंडे, निलेश गिरमे व शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख,उपविभागप्रमुख, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.