शिवसेनेचा पाणीपट्टी वाढीस विरोध
: गटनेते पृथ्वीराज सुतार यांची भूमिका
पुणे : महापालिका प्रशासन पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर दाखल करणार आहे. या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध राहील. अशी भूमिका शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी घेतली आहे. हा प्रस्ताव आणल्यास आंदोलन केले जाईल. असा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे. तसे एक पत्र सुतार यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहे.
: आंदोलन करण्याचा इशारा
सुतार यांच्या पत्रानुसार महापालिका प्रशासन पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर दाखल करणार आहे, असे समजले. महापालिकेकडून पुणेकरांना अद्यापपर्यंत नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. तसेच २४/७ चीयोजना अजूनही पूर्ण झालेली नाही.पाणी पुरवठ्याबाबत पुणेकरांच्या वारंवार तक्रारी येत आहेत आणि आपण पाणीपुरवठा लोकांना नियमित देत नसतानासुद्धा पुणेकरांवर पाणीपट्टीची वाढ आपण लादत आहात. याला शिवसेनेचा पूर्ण विरोध आहे. आपण स्वत:हून हा प्रस्ताव मागे घ्यावा अन्यथा शिवसेना पुणेकरांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा सुतार यांनी दिला आहे.
COMMENTS