Shivsena MLA Disqualification | शिवसैनिकांनी निकालाचे आतषबाजी करीत पुण्यात केले जल्लोषात स्वागत
Shivsena MLA Disqualification | अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला शिवसेनेतील (Shivsena Eknath Shinde) आमदार अपात्रतेचा निकाल आज लागला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत आलेल्या तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय (Pune Shivsena office) येथे फटाक्यांची आतशबाजी करीत व महालक्ष्मी मंदिरात महाआरती करून मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. (Maharashtra Politics)
पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Pune Shivsena) म्हणाले की, “हा ऐतिहासिक निकाल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्थापित केलेले सरकार हे कायद्याद्वारे व संविधानिक तत्वाने स्थापन झालेले सरकार आहे. न्यायदेवतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, इथून पुढे सरकार अजून नव्या ऊर्जेने काम करेल.”
बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकृतपणे काल संध्याकाळी 6 वाजता वाजता जाहीर केला. यामध्ये शिवसेनेतील सर्व आमदार पात्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेलं सरकार हे पूर्णपणे संविधानिक व कायद्याने बनलेले सरकार आहे असे जाहीर झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे, पक्षातील विविध पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत विजयाचा भव्य जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरविले गेले. तसेच, शिवसेनेच्यावतीने मोठ्या उत्साहात आतिषबाजी करत, मध्यवर्ती कार्यालय ते बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन इथपर्यंत भव्य मिरवणूक काढत, आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सवात सहभागी झाल्या
यावेळी संपर्क प्रमुख संजय मशिलकर, शिरूर लोकसभा निरीक्षक विकास रेपाळे, सहसंपर्क प्रमुख अजय बाप्पू भोसले, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, बाळासाहेब पोखरकर,सुरेंद्र जेवरे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, युवासेना सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर,शर्मिला येवले, महिला आघाडी शहर प्रमुख पुजाताई रावेतकर, माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश माझीरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, नवनाथ निवंगुणे, धनंजय जाधव, प्रमोद प्रभुणे, उपशहर प्रमुख सूरज परदेशी, गौरव साईनकर,सचिन थोरात, सुहास कांबळे, श्रुती नाझीरकर,श्रद्धाताई शिंदे, कांचन दोडे,मयूर पानसरे, आकाश शिंदे व शिवसेना, युवासेना सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, अंगिकृत संघटना व शिवसैनिक उपस्थित होते