Shivsena Agitation Against Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे शहर शिवसेना प्रचंड आक्रमक | जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन

HomeBreaking News

Shivsena Agitation Against Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे शहर शिवसेना प्रचंड आक्रमक | जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन

Ganesh Kumar Mule Sep 14, 2024 2:24 PM

Ring Road | पुणे चक्राकार रस्त्यांसाठी (Ring Road) भूसंपादन प्रक्रियेला वेग
Cabinet Meeting Decisions | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ९ निर्णय | जाणून घ्या सविस्तर
Best MP Supriya Sule | देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

Shivsena Agitation Against Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे शहर शिवसेना प्रचंड आक्रमक | जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन

| राहुल गांधी हे संविधान विरोधी- शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

 

Rahul Gandhi Reservation Remark – (The Karbhari News Service) – लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण रद्द करण्याबाबत मांडलेल्या भुमिकेबाबत पुणे शहर शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेना शहर प्रमुख प्रमोद यांना भानगिरे यांच्या नेतृत्वात पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करून राहुल गांधी यांनी समस्त भारतीयांची माफी मागावी अशी मागणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी महिला शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त केला.

 

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या अमेरिकेतील खासगी दौऱ्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशातील आरक्षण कमी करत संपवण्याची वेळ आल्याची विधान केले होते.त्यामुळे अनसुचित जाती जमाती, आणि इतर मागासवर्गीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मुलभुत हक्क या घटकात कलम १७ आणि १८ अन्वये समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण दिले आहे असे असताना आरक्षण रद्द करण्याचे विधान संतापजनक आहे. तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनीच जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे सांगत सामाजिक सलोखा बिघडेल असे विधान केले होते‌. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे पुढे म्हणाले की राहुल गांधी यांनी वेळोवेळी संविधान विरोधी विधाने केली असून, लोकसभा प्रचारादरम्यान माध्यमांमध्ये त्यांनी उघडपणे पत्रकार परिषदेत या पत्रकार परीषदेत किती वार्ताहर मागास प्रवर्गातील आहेत? किती छायाचित्रकार मागास प्रवर्गातील आहेत असे प्रश्न विचारून आपण संविधान विरोधी आहोत हे दाखवून दिले आहे.

विरोधी पक्षनेता हे अत्यंत जवाबदारीचे काम आहे‌, वेळोवेळी राहुल गांधी यांनी विनाकारण सामाजिक सलोखा बिघडेल असे विधान केले आहे. पुणे शहर शिवसेना राहुल गांधी यांच्या या आरक्षण विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून राहुल गांधी यांनी जर माफी मागितली नाही तर अत्यंत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.

 

यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुनाईत, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, उपशहर प्रमुख सचिन थोरात, विकास भांबुरे,सुधीर कुरुमकर,संतोष राजपूत,विकी माने, संजय डोंगरे, शहर समन्वयक नवनाथ निवंगुणे, जिल्हा उपसंघटक पंकज कोद्रे, शहर संघटक श्रीकांत पुजारी,आकाश रेणूसे,अविनाश खेडेकर, महेंद्र जोशी योगेश जोशी,गणेश काची, अभिजीत बोराटे,उद्धव कांबळे, सुरेखाताई पाटील,सुवर्णताई शिंदे, संजय तुरेकर, सुहास कांबळे, आशुतोष शेंडगे, मार्तंडराज धुंदुके व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0