Mohan Joshi Congress | पुण्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येवू दे | माजी आमदार मोहन जोशी यांचे गणरायाला साकडे
Pune News – (The Karbhri News Service) – पुणे शहराचा विकास खऱ्या अर्थाने व्हायचा असेल, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे!, असे साकडे माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दगडूशेठ गणपतीला घातले.
दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन मोहन जोशी यांनी सहकुटुंब श्रींची आरती केली. याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी त्यांना मानाचे महावस्त्र देऊन त्यांचे स्वागत केले.
पुणे शहरात उत्सव शांततेत आणि गुण्यागोविंदाने साजरा होईल, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
COMMENTS